नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेत खाते खोलल्यास आपल्याला पहिल्यांदा त्यात काही रक्कम डिपॉजिट म्हणून भरावी लगाते. त्यानंतरच आपण आपले बँकेतील खाते खोलू शकतात आणि त्याचा उपभोग घेऊ शकतात. आपल्याला खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे देखील आवश्यक असते. जर खात्यात आवश्यक रुपये ठेवले नाहीतर हा मिनिमम बॅलेन्स दंड म्हणून कापण्यास बँक सुरुवात करते. परंतू तुम्हाला माहित आहे का की झीरो रुपये बॅलन्सने देखील तुम्ही तुमचे खाते खोलू शकतात. तसेच झीरो बॅलेन्स खात्यात आता आधिक सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. कारण इतक्यातच आरबीआयने झीरो बॅलेन्स खात्यासाठी नवे नियम लागू केले आहेत.
काय आहे झीरो बॅलेन्स खाते
झीरो बॅलेन्स खाते खरे तर बचत खातेच आहे, परंतू आता या खात्यात तुम्हाला मिनिमम बॅलेन्स ठेण्याची आता काहीही गरज नाही. विद्यार्थ्यांसाठी, सॅलरी अकाउंट आणि जनधन खाते ही सर्व खाती झीरो बॅलेन्स बचत खाती आहेत. बँकेच्या भाषेत या खात्यांना BSBDA (बेसिक सेविंग्स बँक डिपोजिट अकाउंट) म्हणले जाते.
झीरो बॅलेन्स खाते आणि बाकी खात्यात हा आहे फरक
बँकेत एक बचत खाते सुरु करताना तुम्हाला 500 ते 1000 रुपये डिपॉजिट म्हणून जमा केले जाते. तसेच तुम्हाला खात्यात 1000 ते 5000 रुपये ठेवणे आवश्यक असते. खात्यात किती मिनिमम बॅलेन्स ठेवायचे हे तुमचे खाते गावातील बँकेत आहे की मेट्रो सिटीतील यावर आधारित असते.
झीरो बॅलेन्स अकाउंट फ्री मध्ये सुरु करता येते आणि जसे की त्याच्या नवातच आहे की, मिनिमम बॅलेन्स खाते, तर त्यात बॅलेन्स ठेवण्याची गरज देखील लागत नाही. असे असल्याने बॅलेन्स नसला तरी यावर बँक ग्राहकाला कोणताही दंड लावत नाही. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार हे नियम 1 जुलै 2019 पासून लागू होतील.
वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’
सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन
#Video : म्हणून बोनी कपूरने सार्वजनिक ठिकाणी घातला होता श्रीदेवीच्या पँटमध्ये हात