Benelli चं नवं मॉडेल देतंय बुलेटला ‘टक्कर’, फक्त 6 हजारांमध्ये करू शकता बूक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Benelli च्या imperiale 400 BS6 या नव्या मॉडेलची किंमत 1.99 लाखांपासून सुरु होते. म्हणून या बाइकला टक्कर देण्यासाठी बुलेटने देखील Royal enfield classic 350 च्या किंमती मध्ये 20000 हजार रुपयांची वाढ केली आहे.

भारतात Benelli Imperiale 400 BS6 ची एक्स शोरुम किंमत 1.99 रुपये आहे. या बाइकची डिलेव्हरी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. मागील मॉडेल BS4 सारखेच तुम्हाला सिल्वर, रेड आणि ब्लॅक असे तीन रंग उपलब्ध होतील. Benelli imperiale 400 BS6 ची बुकिंग फक्त 6,000 रुपये टोकन रक्कम देऊन करता येईल.

ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन च्या माध्यमातून या बाइकचे बुकिंग करता येईल. Benelli Imperiale 400 मध्ये 374cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले असून, जे 5500 Rpm वर 21 Hp पॉवर आणि 4500 Rpm वर 29 Nm टॉर्क जनरेट करतो. तसेच यासोबत तुम्हाला 3 वर्षापर्यंत अनलिमिटेड वारंटी देखील मिळणार आहे. पहिले दोन वर्ष तुम्हाला कंपनीतर्फे 5 वेळा फ्री सर्व्हिस मिळणार आहे. सोबतच 24 ×7 रॉड सैद असिस्टेंस आणि पीक अँड ड्रॉप सर्व्हिस मिळणार आहे.

तसेच Royal Enfield Bullet 350 BS6 मध्ये 346cc सिंगल सिलेंडर BS6 इंजिन दिलं आहे. जे 5250 Rpm वर 18.93 Hp ची पॉवर आणि 4000 Rpm वर 28 Nm टॉर्क जनरेट करतो. यामध्ये तुम्हाला 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले असून इंजनला फ्युल-इंजेक्शन सिस्टिम दिले आहे.