नेताजींच्या हातात भाजपचा झेंडा, नाराज झाले चंद्र बोस, CAA मुळं सोडू शकतात पक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेच्या हातात भाजपचा झेंडा दिसून आल्यानंतर मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजप नेता आणि सुभाष चंद्र बोस यांचे पंतु चंद्र कुमार बोस यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि CAA बाबत नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा इशारा देखील दिला आहे.

भाजपवर निशाणा साधत चंद्र बोस म्हणाले, भाजपने सीएए बाबत बदल करण्याचा विचार केला नाही तर भाजपात थांबण्याविषयी देखील त्यांना पुनर्विचार करावा लागेल असे चंद्र बोस यांनी स्पष्ट केले. नेताजींच्या हातात भाजपचा झेंडा असलेला फोटो नादिया जिल्ह्यातील असून हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होत आहे.

नेताजी हे एक राजकारणी असले तरी सध्याच्या राजकारणापेक्षाही मोठे होते कारण सध्या कोणतीही अशी पार्टी नाही जी नेताजींसोबत स्वतःला जोडू शकते असे स्पष्ट मत चंद्र बोस यांनी व्यक्त केले आहे.

सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यावर भाजपचा झेंडा लावणे चुकीचे
सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला भाजपचा झेंडा लावल्याने चंद्र कुमार यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे पार्टी अध्यक्ष दिलीप घोष यांना यामध्ये लक्ष घालण्याची देखील मागणी केली आहे.

सीएए मध्ये अभ्यासाची गरज – बोस
सीएए बाबत पारदर्शकतेवर बोलताना चंद्र कुमार म्हणाले की, गृहमंत्र्यांनी नेहमीच सांगितले आहे की, सीएए मध्ये धर्म समाविष्ठ केलेला नाही. जर खरंच यामध्ये धर्माचा संबंध वाटत नसेल तर याबाबत पारदर्शी पद्धतीने विचार करायला पाहिजे. कारण याबाबत अनेक भ्रम आहेत.

मी भाजप प्रवेश करतानाच मोदी आणि शहांना सांगितले होते की मी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने राजकारण करणार आहे. त्यांची विचारधारा धर्मनिरपेक्ष राहिलेली आहे. मात्र जर आता कोणी मला माझ्या विचारांपासून दूर जायला सांगत असेल तर मी भाजपमध्ये थांबण्यावर विचार करेल असे देखील चंद्र कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

CAA बाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे
लोकांना समजावे यासाठी सरकारने लिखित स्वरूपाचे स्पष्टीकरण द्यायला हवे. कारण त्या मुसलमानांचे काय होणार जे सीएए मध्ये दिल्या गेलेल्या तारखेच्या आधी भारतात आलेले आहेत ? यामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे यासाठी केंद्र सरकारने याबाबतची पावले उचलायला जावीत असे चंद्र कुमार यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like