भाजपचा खोटेपणा उघड ! पत्रकाराचा व्हिडिओ जारी करत म्हटले, ‘बंगाल हिंसेचा शिकार…’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर हिंसाचाराच्या घटना सुरुच आहेत. भाजपच्या बंगाल युनिटचे एक व्हिडिओ रिलिज केला आहे. ज्यामध्ये दावा केला, की माणिक मोइत्रा असे सीतलकूची येथे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भाजपने व्हिडिओमध्ये फोटोचा वापर केला.

Advt.

बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात भाजपने 9 लोकांची लिस्ट जारी केली आहे. ज्यामध्ये मोमिक मोइत्रा, मिंटू बर्मन या व्यक्तीचा समावेश आहे. माणिक मोइत्रा असे त्या व्यक्तीचे नाव आहे. हा सीतलकूची येथे ठार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजने व्हिडिओमध्ये ज्या फोटोचा वापर केला तो इंडिया टुडेचा पत्रकार आहे. यादरम्यान झालेल्या वादानंतर भाजपने हा व्हिडिओ काढून टाकला आहे. मात्र, त्यापूर्वी हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. या व्हिडिओमध्ये इंडिया टुडेचे पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा फोटो लावला होता. हा भाजपच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला आहे. त्याला सुमारे 12 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

अभ्रो बनर्जी उठल्यानंतर…

अभ्रो बनर्जी यांनी सांगितले, की आज सकाळी उशीरा उठले. त्यांच्या फोनवर 100 मिस्ड् कॉल आल्याचे दिसले. त्यापूर्वी त्यांना समजले, की आयटी सेलने माणिक मोइत्राच्या जागी त्यांचा फोटोचा वापर केला आहे. पण ते 1400 किमी दूर दिल्लीत आहेत. ते IndiaToday.in सह काम करत आहेत.