राजकारण : राष्ट्रीय स्तरावर सुद्धा होणार का मोदी विरूद्ध ममता ‘सामना’, बंगालच्या निकालाचा 2024 वर किती परिणाम?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशात निवडणुका झाल्या, परंतु प्रत्येकाचे लक्ष पश्चिम बंगालकडे लागले होते. कारण, येथे थेट लढत मोदी विरूद्ध ममता अशी होती. टीएमसी-भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली. निकालावरून स्पष्ट झाले आहे की ममता दीदींनी हॅट्रिक केली आहे. पीएम मोदी आणि भाजपाच्या तमाम डावपेचानंतर सुद्धा टीएमसी 2016 एवढ्या विधानसभा जागांवर पुढे आहे. टीएमसीच्या या विजयाने दोन मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते म्हणजे, आता राष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोदी विरूद्ध ममता यांच्यात ’खेला’ होणार का? बंगाल निवडणुकीच्या निकालाचा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीवर परिणाम होणार का?

तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बनर्जी यांनी बंगाल निवडणूक 2021 मध्ये बहुमत मिळवून आपली ताकद दाखवली आहे. काँग्रेस आणि माकपा जाऊ द्यात, येथे भाजपाला सुद्धा अपेक्षित यश मिळालेले नाही.

कसे आहे सध्याचे राष्ट्रीय चित्र

राष्ट्रीय स्तरावर अजूनही पीएम नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देऊ शकतो, अशा नेत्याचा अभाव आहे. सध्या तरी राहुल गांधी हे एकमेव नाव घेतले जात आहे. परंतु काँग्रेस आपल्या अंतर्गत अडचणीत अडकली आहे, तर इतर विरोधी पक्षसुद्धा आपआपल्या राज्यात अडकून पडले आहेत. अशावेळी सर्वमान्य विरोधी नेत्याबाबत मोठी दरी आहे. शरद पवार असोत की, चंद्र बाबू नायडू, अखिलेश यादव, मायावती, उद्धव ठाकरे किंवा अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षाचा नेता असो, पीएम मोदी यांच्या तुलनेत त्यांचे सामर्थ्य कमी आहे.

ममता आणि राहुलमध्ये कोण भारी?

अशा राजकीय स्थितीत जेव्हा राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या एकछत्री नेत्याची कमतरता असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि टीएमसी प्रमुख ममता बनर्जी यांची शक्यता दिसून येते. आता प्रश्न हा आहे की, जमीनीवरील लढाई लढून विजय मिळवण्याची ताकद कोणत्या नेत्यात जास्त आहे. तर राहुल गांधी यांच्या तुलनेत तेवढा अनुभव दीदींकडे जास्त आहे. बंगाल निवडणुकीत दीदींनी ज्याप्रकारे एकटीने किल्ला लढवला आणि हॅट्रिक बनवण्याचा रस्ता मोकळा केला, हे यश त्यांची राजकीय उंची वाढवणारे आहे. तर राहुल गांधी यांनी सुद्धा केरळ आणि तामिळनाडुवर फोकस केला. केरळमध्ये त्यांना यश मिळाले नाही, परंतु तमिळनाडुत त्यांना डिएमकेसोबत यश मिळाले आहे.

दीदी बंगाल सोडू शकतील का?

बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली होती, सत्तेचा पूर्ण वापर केला, यानंतरही तृणमूल काँग्रेसचा लागोपाठ तिसर्‍यांदा विजय झाला आहे, टीएमसीची मुळं बंगालमध्ये घट्ट झाल्याचे यावरून दिसते. अशावेळी आता हे पहावे लागेल की, दीदी बंगालची सूत्रे आपल्याकडे ठेवत राष्ट्रीय स्तरावर उतरणार की बंगालची गादी अन्य कुणाकडे सोपवून राष्ट्रीय राजकारणात येणार?

बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका रॅलीत पीएम मोदी यांनी म्हटले होते की, नंदीग्राममध्ये आपला पराभव दिसत असल्याने ममता बनर्जी दुसर्‍या जागेवरून निवडणूक लढणार आहेत. या दाव्यावर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ने प्रत्युत्तर दिले, आणि टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विट केले, पीएम मोदी म्हणतात की ममता बॅनर्जी दुसर्‍या सीटवरून लढतील, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्ही बरोबर बोलत आहात आणि ती सीट असेल वाराणसी, मग लढाईसाठी तयार रहा.

विरोधक एकत्र आले तर होऊ शकतो राष्ट्रीय खेला

बंगाल निवडणुकीत ’खेला होबे’ची घोषणा खुप गाजली, ती ममता बॅनर्जीनी आणली आणि पीएम नरेंद्र मोदी आणि इतर भाजपा नेत्यांनी सुद्धा ती खुप खेळवली. परंतु बंगाल गौरवच्या पुढे सोनार बांग्लाचा नारा कमजोर ठरला आणि बंगालच्या वाघीणीने खेला करून दाखवला.

दीदींना सर्वमान्य नेत्या मानणार का विरोधीपक्ष?

आता प्रश्न हा आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, अकाली दल, सपा, बसपा, डीएमके यासारखे विरोधी पक्ष एकत्र येत दीदींना आपल्या नेत्या मानतील का? कुणी या सर्व विरोधी पक्षांना एकत्र जोडून येत्या दोन-तीन वर्षात एनडीएसाठी पर्याय तयार करू शकेल का? विखुरलेल्या विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस आपल्या महत्वकांक्षा काही प्रमाणात मर्यादित करेल का? जर असे झाले तर दीदी राष्ट्रीय स्तरावर खेला करण्यास सक्षम होऊ शकतात. मात्र, सध्यातरी पुढे काय होते ते पाहावे लागेल.