‘संजय राऊत म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ – आ. सांघवी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. या विजयानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही ममतांचा उल्लेख वाघीण असा करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिल्यात. इतकच नाही तर राऊत यांनी ट्विटरवरुनही ममतांसोबतचा फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे मोदींना डिवचले आहे. मात्र या ट्विटवरून भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच सुरतमधील माजुरा येथील आमदार हर्ष सांघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असे म्हणत त्यांनी राऊत यांना टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एक स्त्री, एक जखमी वाघीण मैदानात उतरुन एकटी लढत होती, त्यांच्या पक्षाला उद्ध्वस्त केल, नेत्यांना तोडलं, दबाव आणला, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला. आपलेच लोक विरोधात उभा असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही. लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हे संपूर्ण देश आणि राजकारणासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हणत राऊतांनी बॅनर्जी यांचे कौतुक केले आहे. त्यानंतर ट्विटरवरही बंगालच्या वाघीणीचे अभिनंदन… ओ दीदी… दीदी ओ दीदी…असे ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये ममतांवर टीका करताना त्यांचा उल्लेख, दीदी ओ दीदी असा करायचे. हाच उल्लेख करत राऊतांनी ममतांसोबतचा जुना फोटो ट्विट करुन विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. देशात कोरोनाचं सकंट असतानाही प्रोटोकॉल तोडून रोड शो, रॅली, शक्तीप्रदर्शन सुरु होते. सगळा देश कोरोनाशी लढताना तिथे भाजपा ममतांचा पराभव करण्यासाठी लढत होता. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या बदल्यात तुम्ही त्यांना कोरोना दिला असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला आहे.