Assembly Electionsराजकीय

बंगाल : TMC नेत्यांच्या घरी मिळाल्या EVM मशिन; अधिकारी निलंबित, निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालमध्ये आज मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. बंगालमधील ३१ जागांवर आज मतदान सुरु आहे. मतदान सुरु होताच भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. TMC ने मतदान केंद्रावर मतदारांना त्रास देण्याचा आरोप केला आहे, तर TMC नेत्यांच्या घराबाहेर एक EVM सापडल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

TMC नेत्यांच्या घरी EVM मिळाल्यावरून वाद
उलूबेरिया उत्तरमधून बीजेपी उमेदवार चिरन बेरी यांनी आरोप लावला आहे की मतदानाच्या पहिल्या रात्री TMC नेते गौतम घोष यांच्या घरातून EVM आणि व्हीव्हीपॅट मशीन सापडल्या आहे. भाजप नेत्याने TMC च्या नेत्यांनी निवडणुकीत अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. रात्री उशिरा येथील वातावरण बिघडले आणि त्यानंतर सुरक्षा दलाला लाठीचार्ज करावा लागला.

TMC नेत्यांच्या घराजवळ EVM मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. त्यानंतर सेक्टर ऑफिसरला निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाचे असे म्हणणे आहे की हा एक राखीव EVM होता, जो मतदानामध्ये वापरला जात नव्हता. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की सेक्टर ऑफिसर तपन सरकार EVM सोबत आपल्या नातेवाईकांच्या घरी झोपी गेले, हे नियमांचे उल्लंघन आहे.

TMC आणि BJP यांनी लावला एकमेकांवर आरोप
– मंगळवारी सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने अनेक ठिकाणी EVM मध्ये अडथळा आणल्याचा आरोप करत लोकांना मतदान केंद्रावर जाऊ दिले नाही.

– तृणमूल काँग्रेसने डायमंड हार्बर, उलूबेरिया उत्तर, आरमबाग, मागराघाट पश्चिम आणि अन्य विधानसभा जागांच्या मतदान केंद्रांवर आरोप केले आहेत. TMC चे म्हणणे आहे की येथील सुरक्षा दले मतदारांना त्रास देत आहेत, त्याशिवाय १०० मीटर क्षेत्रातील मतदान केंद्रांवर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत.

– भाजपने असा आरोप केला आहे की TMC च्या कार्यकर्त्यांनी राईदिघी विधानसभामध्ये त्यांचे पोस्टर फाडले होते. याशिवाय बंगालमध्ये मतदानाच्या वेळी, TMC चे कार्यकर्ते राईदिघीच्या बूथ क्रमांक १८९ मध्ये दाखल झाले आणि मतदारांना त्रास देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

बंगालमध्ये मतदानाचा हा तिसरा टप्पा आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये TMC आणि भाजपमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरूच आहे. तिसऱ्या टप्प्यात एकूण ३१ जागांवर मतदान होत आहे.

Back to top button