मनोज तिवारीपासून कंचन मलिक पर्यंत TMC ने ‘या’ स्टार्सला रणांगणात उतरविले, पहा यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सहा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 294 जागांपैकी पक्षाने 291 उमेदवारांना यावेळी मैदानात उतरवले आहे. तर तीन जागा आपल्या मित्रपक्षांची सोडल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी भवानीपुर ऐवजी नंदीग्राम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे.

टीएमसी यावेळी पुन्हा एकदा अनेक स्टार्सना मैदानात उतरविणार आहे. ज्यात क्रिकेटर, अभिनेते, सिंगर, प्रत्येकाला संधी देण्यात आली आहे.

जाणून घेऊया TMC च्या यादीत कोणकोणते स्टार्सना संधी देण्यात आली –
– मनोज तिवारी – शिबपुर (क्रिकेटर)

– कंचन मलिक – उत्तरपाड़ा (अभिनेत्री)

– सयंतिका बनर्जी – बांकुरा (अभिनेत्री)

– शोभानदेब चट्टोपाध्याय – भवानीपुर

– कौशनी मुखर्जी – कृष्णानगर उत्तर (अभिनेत्री)

– अदिति मुंशी – राजरहाट (सिंगर)

– सयोनी घोष – आसनसोल साउथ (अभिनेत्री)

– राज चक्रवर्ती – बैरकपुर (डायरेक्टर)

– इदरिस अली – मुर्शिदाबाद

– सोहम चक्रवर्ती – चांदीपुर (अभिनेता)

– जून मालिया – मिदनापुर (अभिनेत्री)

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये यावेळी 8 टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 27 ला मतदान केले जाईल. तर निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपा आणि टीएमसीमध्ये मोठ्या संख्येने स्टार्सने प्रवेश केला. टीएमसीने यातील अनेकांना उमेदवारीची संधी दिली. आता भाजप काय करणार हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.