माधुरी दीक्षितचा पहिला ‘हिरो’ तापस पॉल यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिचा पहिला चित्रपट अबोधचा हिरो तापस पॉल याचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षाचे होते. बंगाली चित्रपटसृष्टी गाजविणारे अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे ते माजी खासदार होते.

पॉल हे मुलीला भेटण्यासाठी मुंबईला आले होते. कोलकत्ता येथे परत जाण्यासाठी ते पहाटे मुंबई विमानतळावर आले. तेथे त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना जुहू येथील एका रुग्णालयात नेण्यात आहे. पहाटे चार वाजता उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

२०१४ मध्ये तृणमूल काँग्रेस तिकीटावर ते पश्चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते ह्दयविकाराच्या आजाराने त्रस्त होते.

तापस पॉल यांचा जन्म २० सप्टेंबर १९५८ रोजी झाला. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. १९८० मध्ये त्यांचा पहिला दादा किर्ती हा त्यांचा पहिला बंगाली चित्रपट. त्यानंतर त्यांनी अनेक हिट बंगाली चित्रपट दिले. अबोध या चित्रपटातून त्यांनी माधुरी दीक्षितसमवेत बॉलीवूडमध्ये पर्दापण केले होते.

पश्चिम बंगालमध्ये चिट फंडची अनेक प्रकरणे गाजली आहेत. त्यातील रोज व्हॅली चिट फंडमध्ये त्यांचे नाव आले होते. २०१६ मध्ये तापस पॉल यांना सीबीआयने अटक केली होती. १३ महिन्यांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

You might also like