प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सराबंती चॅटर्जीचा भाजपमध्ये प्रवेश, विधानसभा निवडणुका लढणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वारे वाहू लागले आहे. प्रचाराची जोरदार तयारी सुरु असताना प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सरबंती चटर्जीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सोमवारी त्यांनी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व घेतले. विधानसभा निवडणुकीत अभिनेत्रीला भाजपकडून उमेदवारी देखील मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, निवडकीच्या आधीपासूनच विविध पक्षातील नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. यात सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनाही समावेश आहे. दिलीप घोष म्हणाले, भारतीय जनता पक्षात विविध भागातील लोक सामील होत आहेत. आमच्या पक्षात आम्ही सराबंती चॅटर्जी यांचे स्वागत करतो.’

अभिनेत्री बांग्ला चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक हिट चित्रपट दिले आहे. 1997 साली आलेल्या ‘ मायार बाधोन’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2003 मध्ये झालेल्या फिल्म चॅम्पियनमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय तिने अमानुष, कानामाछी, जिओ पगला, छोबियाल सारखे चित्रपट केले आहेत. लवकरच तिची ‘ दूजोने’ वेब सीरिज रिलीज होणार आहे. ती टीव्ही शोमध्ये देखील दिसली आहे. 2003 मध्ये सरबंतीचे राजीव कुमार विश्वास यांच्याशी लग्न झाले होते, परंतु दोघे 2016 मध्ये विभक्त झाले आणि सरबंतीने त्याच वर्षी कृष्णा व्रजशी लग्न केले, परंतु 2017 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर त्याने रोशन सिंगशी लग्न केले.