खासदार बनलेल्या अभिनेत्री नुसरत जहाँचे लग्‍न, पहा पहिल्या फोटोंची ‘झलक’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बंगाली अ‍ॅक्टरेस नुसरत जहांने बंगालचे सुप्रसिद्ध व्यावसायिक निखिल जैन यांच्यासोबत लग्न केले आहे. नुसरत आणि निखिल यांचे तुर्कीतील इस्तंबूलमध्ये लग्न झाले. नुसरत जहांने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेयर केले आहेत.

 Nusrat Jahan
नुसरत यांचा वेडिंग समारंभ प्रायव्हेट होता ज्यात फक्त काही पाहुणे सहभागी होते. हे लग्न हिंदू रीती-रिवाजाने झाले. नुसरत जहांची जवळची मैत्रीण आणि टीमसीची तरुण खासदार मिमी चक्रवर्ती लग्नात दिसून आली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नुसरत टीएमसीच्या तिकिटावर बशीरघाट सीट मधून मैदानात उत्तरली होती आणि ती आता खासदार आहे.

नुसरत आणि निखिलने लग्नाला प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसांची मुखर्जीने डिझाईन केलेले कपडे घातले होते. नुसरत लाल कलरच्या लेहेंगा मध्ये खूप सुंदर दिसत होती. १६ जून रोजी नुसरत आणि निखिल यांचे कुटुंब तुर्कीकडे रवाना झाले होते. १७ जून ला इंस्तानबुल मध्ये प्री-वेडिंग समारंभ झाला.

१८ जून ला मेहेंदी आणि संगीतचा समारंभ झाला. त्यानंतर १९ जून ला पारंपारिक रीती- रिवाजाने कपलचे लग्न झाले. नुसरत लवकरच इंडिया मध्ये येऊन एक छान असे रिसेपशन देणार आहे. नुसरतचा पती निखिल जैन कोलकताचे एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत.
 Nusrat Jahan
निखिल आणि नुसरतची ओळख गेल्या वर्षीच्या दुर्गा पूजा वेळी झाली होती. त्यानंतर दोघांचे बोलणे झाले आणि मग तिने शोतुर चित्रपटापासून पदार्पण केले. या व्यतिरिक्त २९ वर्षाची नुसरत निखिलच्या क्लोदिंग सीरीजची ब्रांड एंबेस्डर पण होती.

आरोग्यविषयक वृत्त –

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा