Coronavirus : लंडनहून भारतात परतली अभिनेत्री खा. मिमी चक्रवर्ती, 7 दिवस होम ‘क्वारंटाईन’मध्ये राहणार

कोलकाता : वृत्तसंस्था – टीएमसी खासदार आणि बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती मंगळवारी इंग्लंडहून भारतात आली आहे. तिनं घोषणा केली आहे की, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता ती आता पुढील 7 दिवस घरातच राहणार आहे. याची खबरदारी म्हणून ती आता आपल्या आई वडिलांना भेटण्याचंही टाळणार आहे. मिमी इंग्लंडला बाजीच्या शुटींगासाठी गेली होती. ती इथं डमडम विमानतळावर उतरली होती. तिनं थर्मल स्क्रिनिंग आणि कोलकातामध्ये लँडिंग संबंधित कोरोनाच्या इतर औपचारिकता पूर्ण केल्या. तिच्यासोबत सहअभिनेता जीत देखील दिसला.

जाधवपूरची खासदार असणाऱ्या मिमीनं मिडियाला सांगितलं की, ती दुबईमार्गे इंग्लंडहून कोलकात्याला आली आहे. ती पुढील सात दिवस घरातच राहणार आहे. आई वडिलांना भेटणंही ती टाळणार आहे. ती म्हणाली सध्या आपण वाईट परिस्थितीतून जात आहोत. परंतु मला खात्री आहे की, ही वेळ निघून जाईल. सरकारनं सांगितलेल्या स्वच्छतेच्या गाईडलाईन्स आपण फॉलो करायला हव्यात. वेळोवेळी हात धुवायला हवेत. काळजी घ्यायला हवी. लोकांपासून अंतर ठेवयाला हवं.” असंही तिनं सांगितलं.

लंडनच्या स्थितीबद्दल बोलताना मिमीनं सांगितलं की, ती आणि फिल्म युनिट सार्वजनिक ठिकाणी शुटींग करत होते. तेथील स्थितीबद्दल ती जास्त काही सांगू शकत नाही. परंतु मास्क घालणारी लोकं कमी होती असंही ती म्हणाली.