… म्हणून बंगळुरूमध्ये ५ वर्षासाठी कन्स्ट्रक्शनवर बंदी ?

बंगळुरू : वृत्तसंस्था – जागतिक तापमानवाढीचे प्रतिकूल परिणाम वातावरणावर होताना दिसून येत आहे. खास करून मान्सूनवर बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन दक्षिणेकडील राज्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. चेन्नई नंतर आता कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहराला देखील पाणीटंचाईच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. बंगळुरूमध्ये नव्याने निर्माण झालेल्या शहरात आणि आयटी कॉरिडॉरमध्ये पाण्याची सर्वात जास्त कमतरता भासत आहे. २०१९ ते २०३१ दरम्यान बंगळुरू शहराची लोकसंख्या ८० लाखावरून २ कोटी ३ लाख होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे ५ वर्षांसाठी नवीन कंस्ट्रक्शनवर बंदी लावली जाऊ शकते.

भारतीय विज्ञान संस्थेच्या शोधानुसार, जर लोकसंख्या याच वेगाने वाढत राहिली तर पुढील काही वर्षात शहरात राहणे देखील मुश्किल होऊन जाईल. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील नैसर्गिक स्रोतांवर तसेच विविध सुविधांवर ताण येत आहे. यांमुळे शहरातील भूजलपातळी सातत्याने कमी होताना दिसून येत आहे.

नवीन परिसरात टँकर आणि बोअरवेल्सवर पाणी

शहरातील नवीन वसाहतीत टँकर आणि बोअरवेल्सचा वापर करून पाणीपुरवठा केला जातो. एका अहवालानुसार, प्रति व्यक्ती भूजलपातळी वेगाने घटत आहे. १९५१ मध्ये प्रतिव्यक्ती भूजल उपलब्धता १४,१८० लिटर इतकी होती. २००१ मध्ये ही पातळी कमी होऊन ५१२० लिटर झाली. २०२५ पर्यंत प्रतिव्यक्ती भूजलाची उपलब्धता ३६७० लिटर होईल. अहवालानुसार देशस्तील २१ मोठ्या शहरांमध्ये २०२० पर्यंत भूजलपातळी संपून जाईल. देशात असणाऱ्या ५४ % विहिरी कोरड्या पडतील.

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

पोलीस नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांशी अश्लिल बोलणारा जेरबंद