‘पाकिस्तान जिंदाबाद’ चा नारा देणाऱ्या आमुल्याच्या कोठडीत ‘वाढ’

बंगळुरु : वृत्तसंस्था – पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्या अमुल्या लिओनच्या अडणीत वाढ झाली आहे. बंगळूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आयोजित मोर्चात तिने घोषणा दिल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. विशेष म्हणजे एएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर अमुल्याने घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी बंगळुरू न्यायालयाने तिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.

बंगळुरूमध्ये 20 फेब्रुवारीला सीएएविरुद्ध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत व्यासपीठावर असणाऱ्या 19 वर्षीय अमुल्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. रॅलीमध्ये वादग्रस्त घोषणाबाजी केल्या प्रकरणी अमुल्याविरोधात आयपीसीच्या कलम 124 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता या कोठडीत मुदतवाढ केली असून तिला 5 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मंचावर असताना अमूल्यानं मंचावर दाखल होत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे काहीवेळासाठी त्यांच्यासह आयोजकही गोंधळून गेले होते. यानंतर ओवेसी यांनी या घटनेची तात्काळ मंचावरूनच निंदा केली. शत्रू देशाच्या पक्षात दिल्या जाणाऱ्या घोषणांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आम्ही याची निंदा करतो. घडलं ते चुकीचंच होतं असे म्हणत ओवेसी यांनी वेळीच परिस्थिती सावरली.