पहिल्या रात्री आधीच युवकाला दिसला नियोजित ‘वधू’चा दुसर्‍यासोबत ‘अश्लील’ व्हिडीओ

बेंगळुरू : वृत्तसंस्था – लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीचा एका व्यक्तीसोबत अश्लील व्हिडीओ पाहून पतीने पोलिसांकडे तक्रार केली असून पत्नीवर कारवाई करण्याची मागणी पतीने केली आहे.

बेंगळुरू मधील सुब्रमण्यननगरमध्ये राहणाऱ्या प्रतीकचा (नाव बदलेलं) चिकमंगळुरु येथील प्रियाशी (नाव बदलेलं) जून २०१९ मध्ये साखरपुडा झाला होता. तर डिसेंबर २०१९ ला हसन येथे दोघांनी लग्न केलं होतं. प्रतीक हा एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. तर प्रिया ही सरकार कर्मचारी आहे. साखरपुड्यावर प्रतीकने १.२ लाख तर लग्नावर तब्बल ७.६ लाख रुपये खर्च केला होता. लग्नानंतरची पहिली रात्र त्यांची १५ डिसेंबरला होती.

तक्रारीत प्रतीकने म्हटले आहे की, १३ डिसेंबरच्या रात्री फेसबुक मेसेंजरवरून बायकोचे काही अश्लील फोटो आले. त्यात ती दुसऱ्या एका व्यक्तीसोबत शारीरिक संबंध करताना दिसत आहे. या फोटोसोबत त्या व्यक्तीने त्याचा नंबर दिला होता. त्यानंबरवर फोन केल्यानंतर प्रिया आणि आपले गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध आहे, असं राकेशने (नाव बदलेलं) या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले. असं प्रतीकने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

३० जून रोजी आमचा साखरपुडा झाल्यानंतरही प्रियाचे राकेशशी शारीरिक संबंध कायम होते, असा दावा राकेशने केल्याचं प्रतीक म्हणाला. त्यांनतर राकेश ने प्रतीकला एक पॉर्न व्हिडीओ पाठवला. राकेश आणि प्रियाचा शारीरिक संबंध करतानाच हा व्हिडीओ होता. यानंतर १० आणि १२ डिसेंबर ला प्रिया आणि राकेश यांचे व्हाट्सअँप वर झालेल्या चॅटिंगचे काही स्क्रीन शॉटही आपल्याला पाठवले गेले. त्यात प्रिया एका मेसेजमध्ये राकेशला म्हणते की, राकेश तू मला खूप आवडतो, पण घरच्यांना प्रतीक आवडतो. प्रतीकला मी शाप ठरेल. असं त्या मेसेजमध्ये असल्याचे प्रतीकने तक्रारीत म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like