‘कोरोना’ व्हायरसला मारेल बेंगळुरूमध्ये बनलेले ‘हे’ खास उपकरण, अमेरिका आणि यूरोपियन युनियननं दिली मंजूरी

बंगळुरू : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनो व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यास मारण्याची क्षमता असलेले एक उपकरण स्कॅलेन हायपरस्चार्ज कोरोना कॅनन (सायकोकॅन) ला यूएस फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) आणि युरोपीय संघ (ईयू) कडून मंजूरी मिळाली आहे. हे उपकरण बेंगळुरुतील संस्था ’डि स्कॅलेन’ने विकसित केल्याचे न्यूज -18 च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

सायकोकॅन एक छोट्या ड्रमप्रमाणे आहे, जे सहज एखादे, ऑफिस, शाळा, मॉल, हॉटेल, एयरपोर्ट किंवा अशा बंद ठिकाणी ठेवता येते. याच्या वापराने पृष्ठभाग विषाणूमुक्त ठेवता येतो. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे की, कोरोना व्हायरसमधील स्पाइक प्रोटिन किंवा एस-प्रोटिनला 99.9 टक्के पर्यंत निष्प्रभ करते.

मात्र, हे उपकरण संक्रमित व्यक्तीला बरे करू शकत नाही, परंतु व्हायरसला पसरण्यापासून रोखू शकते.

हे खास उपकरण कोणत्याही बंद खोलीत शेकडो इलेक्ट्रॉन भरते. अशावेळी एखादा संक्रमित व्यक्ती जरी खोलीत आला किंवा तो शिंकला, खोकला तरी त्यातून पसरलेले व्हायरस निष्प्रभ करते. सोबतच हे पृष्ठभागावर असलेले व्हायरस सुद्धा मारून टाकते. यामुळे हवेतून व्हायरस पसरण्याचा धोका खुप कमी होतो.

अधिकार्‍यांनुसार या उपकरणाच्या निर्मितीची मंजूरी मागच्या आठवड्यात मिळाली आहे. संस्थेशी संबंधित राजा विजय कुमार यांनी सांगितले की, सायकोकॅनला 26 टेस्टमधून जावे लागले. या टेस्ट अंतर्गत उपकरणाशी संबंधित सुरक्षा, क्षमता आणि ही गोष्ट देखील पडताळण्यात आली की याचा वाईट परिणाम माणसावर तर होत नाही ना.

विजय कुमार यांच्यानुसार या उपकरणाची किंमत उत्पादन लायसन्स मिळवणार्‍यावर कंपनीवर अवलंबून असणार आहे. भारतात 9 कंपन्या इच्छूक आहेत. तीन कंपन्या तर लायसन्स अ‍ॅग्रीमेंटसाठी सुद्धा तयार आहेत.