अल्पवयीन मुलानं केली वडिलांच्या लफड्याची ‘पोलखोल’ !

बंगळुरू : वृत्तसंस्था – लहान मुलं भलतीच चंचल असतात. त्यांना सतत काहीना काही तरी खेळायला पाहिजे असते. सध्याच्या काळात त्यांना गुंतवून ठेवण्याचा सोप्पा उपाय म्हणजे मोबाईल फोन. पण हाच सोप्पा उपाय एका ४३ वर्षीय व्यक्तीला चांगलाच महागात पडलाय. बंगळूरूमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने आपल्या लहान मुलाला मोबाईल खेळायला दिला. १४ वर्षीय मुलगा मोबाईलमध्ये गुंतून राहील असे त्यांना वाटले होते. पण त्यांचा हा समज चांगलाच चुकीचा ठरला.

या मुलाने मोबाईलचा वापर करून चक्क बापाचे विवाहबाह्य संबंधच बाहेर काढले. नागाराजू असे त्या तोंडघशी पडलेल्या बापाचे नाव. नागाराजूचे एक महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. मोबाइलमधले प्रेयसीसोबतचे ऑडिओ रेकॉर्डिंग मुलाच्या हाती लागले. ही गोष्ट त्याने आईच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे मोबाइल मुलाच्या हातात देण्याचा निर्णय नागाराजूला चांगलाच महाग पडला असून १५ वर्षाचा संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

पत्नीची पोलीस स्थानकात तक्रार

सदर व्यक्तीच्या पत्नीने नवऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसात धाव घेतली आहे. नवऱ्याने मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. पत्नी शाळेत शिक्षिका आहे. ११ जुलैला नागाराजूने त्याचा मोबाइल फोन मुलाला खेळण्यासाठी दिला होता. खेळता खेळता मुलाने फोन रेकॉर्डर आणि व्हॉट्स अ‍ॅप चॅट ओपन केला.

मुलाने अशी केली पोलखोल

त्यावेळी त्याला वडिलांचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचे कळले. वडिल आणि संबंधित महिलेमध्ये झालेले अश्लील संवादाचे मेसेजेस त्याने पाहिले. त्याने लगेच आईला ते सर्व मेसेज दाखवले. जेव्हा पत्नीने नागाराजूला याबद्दल जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. याबद्दल कुटुंबीयांकडे वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी नागाराजूने धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like