‘हाता-पाया ; वर दररोज उगवते झाड ! त्रासापासुन वाचण्यासाठी तो म्हणतो, ‘प्लीज तोडा माझे हात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांग्लादेशातील ‘ट्री – मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले अब्दुल बजनदार यांनी आपले हाथ कापावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की कृपया माझे हात कापून टाका, मला या त्रासापासून सुटका हवी आहे. यावर त्यांच्या पत्नीने देखील त्यांचे म्हणणे मान्य केले. त्यांच्या पत्नीने सांगितले की, हात कापल्याने त्यांना या त्रासापासून मुक्ती मिळेल. कमीत कमी त्यांना या भयंकर रोगापासून सुटका तरी मिळेल.

ट्री मॅनला पहिल्यांदा 10 वर्षाचे असल्यापासून त्रास होण्यास सुरुवात झाली होती. 2016 पासून अब्दुल बजनदार यांची सर्जरी झाली होती. 2016 मध्येच त्यांचे 6 किलोच्या हाताच्या पेशी कापण्यात आला होत्या. परंतू त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण पुन्हा एकदा त्याच्या हातावर असा झाडासारख्या पेशी उगू लागल्या होत्या.
काय आहे ट्री मॅनला झालेला आजार –
अब्दुल बजनदार याला एपिजर्मोडिस्प्लासिया वेरुसीफोर्मिस नावाचा आजार आहे. या आजाराला ट्री मॅन सिंड्रोम म्हणले जाते. आता अब्दुल यांचे वय 28 वर्ष आहे. हा जीन्सशी संबंधित आजार आहे. ज्यात असामान्य पद्धतीच्या पेशी शरिरावर येतात आणि त्वचेबरोबर त्याचा विकास होत जातो.

जेनेटिक अ‍ॅन्ड रेयर डिसीज इंफॉर्मेशन सेंटर (GARD) नुसार या आजाराने ग्रासलेल्या लोकांना अचूक आकडेवारी सांगणे अवघड होते. परंतू असे असले तरी जगभरात या आजाराचे 200 पेक्षा अधिक केस दाखल झाल्या आहेत. या संस्थेनुसार अशा आजाराने ग्रासलेल्या रोगींवर उपचार केले जाऊ शकत नाही. परंतू सर्जरीचा उपाय मात्र आहे.

अब्दुल करु इच्छित आहे पुर्ण उपचार –
अब्दुल बजनदार यांनी सांगितले की, मी रुग्णालयातून उपचार सोडून चूक केली. मी दुसऱ्या पद्धतीने उपाय करण्याचा निर्णय घेतला. परंतू काहीही फायदा झालेला नाही. आता माझ्या लक्षात आले आहे की, मला रुग्णालय सोडायला नको होते.

अब्दुल बजनदारची प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या सामांता लाला सेन यांनी सांगितले की, डॉक्टर लवकरच यावर अधिक फायदेशीर उपचार करणार आहेत,परंतू त्यांना आता पुर्ण उपचार पुन्हा सुरु करावे लागतील.

अब्दुल बजनदार यांनी सांगितले की, झाडाच्या फांद्यासारखे फाद्या हाताच्या नव्या भागात देखील वाढत आहेत. मला खात्री आहे की डॉक्टर माझा आजार बरा करतील. असे असले तरी या आजारावर कायम स्वरुपीचा उपचार नाही. परंतू याता होणारे त्रास हा असहाय्य करणारा आहे. मला वाटते की माझे हात कापून टाकण्यात यावेत.

आरोग्य विषयक वृत्त

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात