गुळाचे ‘हे’ फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कराल दररोज सेवन

पोलिसनामा ऑनलाइन – साखर आणि गूळ दोन्ही पदार्थ उसापासूनच तयार केले जातात. परंतु, साखरेच्या तुलनेत गूळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतो. गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, अशा अनेक पदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जातो. गुळाचे आपल्या आरोग्यास कोणते फायदे होतात याचबद्दल आज माहिती घेणार आहोत.

गुळाचे फायदे –

1) गूळ-शेंगदाणे खाल्ल्यानं हिमोग्लोबीन लवकर वाढतं.

2) मासिक पाळीच्या वेळी तीळ आणि गुळ खाल्ल्यानं पोट दुखणं कमी होतं.

3) पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं.

4) शारीरिक अशक्तपणा किंवा थकवा जास्त असल्यास गूळ खावा.

5) थंडीच्या दिवसात गूळ खाणं फायदेशीर आहे. मात्र तो प्रमाणात असावा.

6) गुळामधील डी जीवनसत्व मधुमेह उपचारावर फायदेशीर आहे.

7) गुळामुळं पचनशक्ती सुधारते.

8) चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स असल्यास गूळ खावा.

हेही लक्षात घ्या

गुळाचं सेवन हे प्रमाणात असावं. जर तुम्ही जास्त प्रमाणात याचं सेवन केलं तर रक्त दूषित होऊन अंगावर फोड येण्याची शक्यता असते. त्यामुळं ज्यांना त्वचारोग आहे त्यांनी गूळ खाणं टाळावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.