जाणून घ्या ‘कुळीथ’ म्हणजेच ‘हुलगा’ खाण्याचे ‘हे’ 8 फायदे ! ‘या’ आजारात सेवन करणं टाळावं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कुळीथ हे खूप कमी ठिकाणी खाल्ले जातात. परंतु कोकणात याला प्रचंड महत्त्व आहे. कोकणातील घरांमध्ये कुळीथाची पिठी (पिठलं) आवर्जून केली जाते. खास बात अशी की, याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. यालाच हुलगा म्हटलं जातं. आज याच्या फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) आजारपण आल्यास कुळथाचं कढणं किंवा सूप करून रुग्णाला दिलं तर त्याला आराम मिळतो. भरपूर ताकात कुळीथ शिजवून जिरे, तुपाची फोडणी दिली की, उत्तम कढण तयार होतं.

2) कुळथाचं कढण वातनाशक असून जेवणात रुची उत्पन्न करणारं आहे.

3) कुळथाच्या काढ्यानं लघवी साफ होते.

4) मुतखडा झाल्यास कुळथापासून तयार केलेल्या पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

5) कुळथाच्या काढ्यात थोडी सुंठ आणि पादेलोण मिसळून प्यावा. यामुळं लघवी मोकळी होते. तात्पुरता आराम मिळतो.

6) लघवी करताना त्रास होत असेल किंव जळजळ होत असेल तर कुळथाच्या सेवनानं आराम मिळतो.

7) खूप कफ असलेला खोकला, दमा या विकारात कुळथाचा काढा उपयोगी आहे.

8) गंडमाळा, मूळव्याध, शुद्ध आमवात, यकृत, प्लीहेची सूज या विकारात कुळथाचा काढा फायदेशीर ठरतो.

या आजारात कुळथाचं सेवन करणं टाळावं

1) कोरडा किंवा सुकलेला कफ विकारात कुळीथ उपयोगी नाही.

2) रक्ती मूळव्याध, आम्लपित्त विकार असलेल्यांनी कुळीथ खाऊ नये.

3) रक्तविकार असलेल्या व्यक्तींनी शक्यतो कुळीथ खाणं टाळावं.

टीप –   वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.