जाणून घ्या वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पोलीसनामा ऑनलाईन :

वाफ घेण्याची पद्धत –

चेहऱ्यावर वाफ घेण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करावं. गरम पाणी झाल्यावर भांडे गॅसवरून खाली काढून घ्या. गॅसवर वाफ घेण्याची चूक करु नका. वाफ घेण्यापूर्वी आ‍पले केस बांधून घ्यावे. नंतर आपल्या डोक्यावर टॉवेल झाकून आपला चेहरा त्या भांड्यापासून थोड्या लांबीवर ठेवा. सर्व बाजूने टॉवेल झाकून घ्या आणि आता आपल्या चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या.

फायदे

चेहर्‍यावर वाफ घेतल्याने त्वचेत आढळणारे टॉक्सिन कमी होतात.

पाण्याच्या वाफेमुळे आपल्या त्वचेमधील रक्त प्रवाह सुधारतो.

चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोकळी होतात.

चेहर्‍यावरील मृत त्वचा निघून जाते.

त्वचेमधील ओलावादेखील कायम राहतो.

त्वचेवरील थकवा, सुस्ती दूर होण्यास मदत मिळते.

त्वचा अधिक तरुण दिसू लागते.

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागते.

टीप : वाफ घेतल्यानंतर हवेत किंवा धुळीत फिरू नका. कारण वाफ घेतल्यामूळे तुमच्या चेहेऱ्यावरील रोमछिद्रे ओपन झालेली असतात असतात. जेव्हा तुम्ही हवेत किंवा धुळीत फिरता तेव्हा हवेतील कण पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर जाऊन बसतात.