डोकं गरगरतंय म्हणजे नेमकं काय ? जाणून घ्या ‘या’ आजाराची 5 लक्षणे अन् 2 कारणे

पोलिसनामा ऑनलाइन – बिनाइन पॅरॉक्सिसमल पोझिशनल वर्टिगो (बीपीपीवी) चक्कर येण्याच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. यामध्ये डोकं गरगरल्यासारखे वाटते. बिनाइन म्हणजे गंभीर जीवनघेणे नसणे. तर पॅरॉक्सिसमलचा अर्थ अचानक येणारा अटॅक आहे. पोझिशनलचा अर्थ डोक्याचे एखादे विशेष पोस्चर किंवा हलवल्याने चक्कर येणे. यामध्ये जोरात चक्कर येऊ शकते. विशेषता कुशी बदलताना, डोके वर-खाली करताना असे होऊ शकते. यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. मात्र, सतत चक्कर येऊ लागल्यास या स्थितीला गंभीर म्हटले जाऊ शकते.

ही आहेत लक्षणे
1 चक्कर येणे
2 डोके किंवा आजूबाजूच्या वस्तू फिरत आहेत असे वाटणे
3 संतुलन किंवा स्थिरतेची कमतरता
4 धडधड होणे
5 उलटी

ही आहेत कारणे
1 अचूक कारणे माहिती नसली तरी अनुभवांती डॉक्टर सांगतात डोक्याला जोरदार किंवा हलका झटका बसल्याने बीपीपीवी होऊ शकते.
2 आतील भागाचे नुकसान होणे, परंतु असे खुप कमी वेळा होते.
या आजाराचा संबंध मायग्रेनशी असू शकतो.

हा आहे उपचार
काही आठवड्यात रूग्ण बरा होऊ शकतो. डॉक्टर, ऑडियोलॉजिस्ट किंवा फिजिकल थेरेपिस्ट ’कॅनालिथ रिपोजिशन प्रोसीजर’ नावाची थेरेपी करतात.