…आणि जर्मनीच्या रस्त्यावर चॉकलेटची नदी वाहू लागली

बर्लिन : वृत्तसंस्था – रस्त्यावर अनेकदा टँकर उलटल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या आहेत. दरम्यान अशा घटना घडल्यानंतर रस्त्यावर एखादा दुधाचा किंवा तत्सम वाहतूक करणारा टँकर उलटला तर काय होते हे सर्वजण जाणतोच. आपल्याकडे तुम्ही दुधाचा टँकर उलटल्याचे ऐकले असेल, तुम्ही पेट्रोलचा टँकर उलटल्याचं ऐकलं असेल परंतु तुम्ही चाॅकलेटचा टँकर उलटल्याचे नसेल ऐकले. एका शहरात चक्क चाॅकलेटचा टँकर उलटल्याची घटना समोर आली आहे. आणि रस्त्यावर चाॅकलेटची नदीच वाहू लागली.

जर्मनीत वेस्टोनन शहरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. तिथे ड्रेईमिस्टर चॉकलेट फॅक्टरीचा एक टँकर रस्त्यावरून जात असताना अचानक उलटला आणि साऱ्या रस्त्यावर चाॅकलेटच चाॅकलेट पाहायला मिळाले. परंतु यानंतर काही वेगळाच प्रकार झाला. ही चॉकलेटची वाहती नदीही काही वेळातच गोठली आणि चॉकलेट घट्ट झाल्याचे दिसून आले. दरम्यान  युरोपमधील हिवाळा किती कडक असतो, हे यावेळीही दिसून आले. ही चॉकलेटची वाहती नदीही काही वेळातच गोठली आणि चॉकलेट घट्ट झाले. सुमारे एक टन लिक्विड चॉकलेट रस्त्यावर असे लादीसारखे साचून राहिले.

चाॅकलेटची ही गोठलेली नदी म्हणजे. एखादा चॉकलेटी गालिचा कुणी तरी रस्त्यावर पसरवला आहे असेच काहीसे दृश्य दिसत होते. मुख्य म्हणजे तब्बल एक टन लिक्विड चॉकलेट रस्त्यावर असे लादीसारखे साचून राहिल्याचे पाहायला मिळाले. चाॅकलेटच्या नदी बाबत माहिती देताना स्थानिक अग्निशमन विभागाने सांगितले की, सुमारे दोन तास हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. रस्ता बंद ठेवल्यानंतर या रस्त्याच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले. या रस्ता साफ करताना अनेक कर्मचाऱ्यांना खूपच मेहनत घ्यावी लागल्याचे दिसून आले.

टँकर उलटण्याची अशीच एक घटना पोलंडमध्ये घडल्याचे समोर आले होते. दरम्यान यापूर्वीही पोलंडमध्ये एक टँकर उलटून 12 टन चॉकलेट हायवेवर वाहू लागले होते असे चित्र पाहायला मिळाले.