मोदी सरकारचा सरकारी नोकरदारांना मोठा दणका ! आता मिळणार नाहीत ‘या’ कामासाठी पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी कार्यालयामध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काम केल्यावर कर्मचाऱ्यांना मेहनता मिळतो. सरकारी कार्यालयामध्ये आठ तास काम करावे लागते. मात्र अधिक पगारासाठी अनेक जण जास्त काम देखील करतात. परंतु आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार कर्मचाऱ्यांना अधिक काम केल्याचा कोणताही मेहनता मिळणार नाही. मोदी सरकारने सरकारी नोकरदारांना मोठा दणका दिला आहे.

कर्मचाऱ्यांना पगार हा त्यांच्या आठ तासाच्या कामावर दिला जातो. त्यातही एका महिन्यात चार सुट्ट्या असतात. त्यामुळे आता केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत देखील वाढ होऊ शकते.

12-16 तास असणार आता कामाची वेळ –

खास श्रेणी असलेल्या कर्माचाऱ्यांसाठीही नियमात बदल होणार आहेत. महत्त्वाची पदे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 16 तास काम करावे लागणार आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांना आता आठ तासाऐवजी नऊ तास ड्युटी करावी लागणार आहे. तसेच कर्मचारी जास्तीत जास्त बारा तसाच काम करू शकतात. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना तासाप्रमाणे पगार दिला जाऊ शकतो.

असे ठरणार वेतन –

सरकारी कामगारांच्या घरात 4 सदस्य असल्यास त्यांना वर्षाला 66 मीटर कापड, 10% घरभाडे, 20% खर्च आणि 25% मुलांच्या शिक्षणाचा खर्च मिळणार आहे. तसेच वेतन ठरवताना भौगोलिक बाबींकडे देखील लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी महानगर, शहर, गाव अशी वर्गवारी केली जाणार आहे.

सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर मिळणार जास्तीचा मेहनता –

केंद्र सरकारच्या श्रम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता जास्त काम केल्यावर कोणताही मेहनता दिला जाणार नाही तर केवळ सुट्टीच्या दिवशीच जास्त काम केल्याचा मेहनता मिळणार आहे. प्रत्येक राज्यामध्ये ही रक्कम वेगवेगळी आहे नागालॅंडमध्ये 115 तर केरळमध्ये 1 हजार 192 रुपये इतका मेहनता दिला जातो.

Visit : Policenama.com