PM मोदींच्या व्यतिरिक्‍त राजस्थानच्या ‘पायल’ला भेटला ‘चेंजमेकर अवॉर्ड’, जगभरातून कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेमध्ये बिल अ‍ॅँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन तर्फे गोलकीपर ग्लोबल गोल्स अवॉर्ड्स कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंंद्र मोदी व्यतिरिक्त एका अजून भारतीय व्यक्तीला ‘चेंजमेकर अवॉर्ड’ मिळाला आहे. राजस्थानमध्ये बाल कामगार आणि बाल विवाहाला संपवण्यासाठी चालू केलेल्या अभियाना अंतर्गत पायल जांगिडला हा अवॉर्ड देण्यात आला आहे.

यावेळी पायलने सांगितले की ती खूप खुश आहे कारण तिला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार मिळाला आहे. ज्याप्रमाणे गावामध्ये हे अभियान राबवले त्या प्रमाणे देशभरात राबवायचे असल्याचे पायलने यावेळी सांगितले.

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले कौतुक
पुरस्कार मिळाल्यानंतर पायल आणि तिच्या या अभियानाचे देशभरातून कौतुक होत आहे. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी सांगितले की पायलने ‘चेंजमेकर अवॉर्ड’ मिळवून आमचा गौरव वाढवला आहे. कारण ती एक अशी तरुणी आहे जी भारत आणि इतर देशातही लहान मुलांच्या प्रश्नाबाबत लढाई लढण्यासाठी अग्रेसर आहे.

पायलने आपल्या बालविवाहाला विरोध करत लग्न न करण्याचे धाडस दाखवले आणि पायलची हिम्मत पाहून परिसरातील आजूबाजूच्या मुलींनीदेखील बाल विवाहाला जोरदार विरोध केला होता. गेट्स फाउंडेशन ने आपल्या ट्विटर वरून पायलची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.

Visit : policenama.com