लहान मुलांची ‘स्मरणशक्ती’ लठ्ठपणामुळे होते कमी, जाणून घ्या 4 उपाय

वजन वाढणे, किंवा लठ्ठपणा ही समस्या केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात तापदायक ठरत आहे. लाखो लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. महत्वाचे म्हणजे ही समस्या सर्वच वयोगटात दिसून येत असल्याने लहान मुलांनाही लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. आपल्या मुलांना लठ्ठपणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पालकांनी नेहमीच केला पाहिजे, कारण लठ्ठपणामुळे लहान मुलांमध्ये विस्मरणासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या का निर्माण होतात यावर वेरमॉन्ट युनिव्हर्सिटी आणि येल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधन केले आहे. या संशोधनातील काही महत्वाची निष्कर्ष जाणून घेवूयात.

संशोधनातील निष्कर्ष

1 संशोधनानुसार ज्या मुलांचे बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) जास्त होते. त्या मुलांची मेमरी कमजोर होती.

2 जास्त बीएमआय इन्डेस्क असलेल्या लोकांमध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ होत जात असतो. सेरेब्रल कॉर्टेक्स हा मानवी शरीराच्या मेंदूतील असा भाग असतो. ज्यामुळे मेंदू बाहेरच्या बाजूने झाकला जातो. याच्या पातळ होण्याने कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची समस्या वाढते.

हे उपाय करा

1 लहान मुलांना व्यायाम करण्याची सवय लावा.
2 लठ्ठपणा आणि कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी पोषक आहार द्या.
3 लहान मुलांना बाहेर खाण्याची सवय लावू नका.
4 मुलांना घरातच पौष्टीक पदार्थ खायला द्या.