विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर ! मिळणार ‘इंस्टंट’ लोन, ‘हे’ ५ अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉलेज सुरु झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांचे कॉलेजचे वेगळेच लाईफ सुरु होते. तर अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी विविध शहरात, राज्यात जातात. यावेळी त्यांना जेवण, खर्चायला लागणारे पैसे याची समस्या येते. अशा वेळी तुमच्याकडे हे ५ अ‍ॅप नक्की हवे जे तुम्हाला योग्यवेळी योग्य मदत करतील. हे आहेत ते खास अ‍ॅप ज्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेच्या वेळी कर्ज देखील मिळू शकते तर जेवण देखील ते या अ‍ॅपच्या माध्यमातून मागवू शकतात.

mPokket
हे एक असे अ‍ॅप आहे ज्यात कोणत्याही अडचणीशिवाय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक कर्ज मिळू शकते. कोणत्याही कागद पत्राशिवाय यात विद्यार्थ्यांना कर्ज देण्यात येते. भारतातील कोणताही विद्यार्थी या अ‍ॅपच्या माध्यमातून इंस्टंट लोन मिळवू शकतात.

Alarmy
हे एक अलार्म अ‍ॅप आहे, जे विद्यार्थ्यांना अत्यंत उपयोगी ठरु शकते. जर तु्म्ही हे अ‍ॅप डाऊनलोड केले तर याचा अलार्म बंद करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोटोवर क्लिक करावे लागेल किंवा फोन थोडासा हलवावा लागेल. यामुळे यूजरला जाग येईल.

Ridlr
यामुळे विद्यार्थ्यांना बस, मेट्रो आणि रेल्वेची नेमकी माहिती मिळेल. याशिवाय या सर्वाचे कौन्सिल होईल, जर उशीर होणार असेल तर त्यासंबंधित माहिती देखील हे अ‍ॅप तुम्हाला देईल. तुम्हाला या अ‍ॅपच्या माध्यमातून ट्रांसपोर्टेशनचे इतर पर्याय देखील मिळतील.

Dropbox
या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही नोट्स आणि स्टडी मटेरियल एकाच जागी ठेऊ शकतात. यात हे कोणतेही अभ्यासाचे साहित्य डिलीट होणार नाही.

Swiggy / Zomato
अनेक विद्यार्थी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात शिक्षणासाठी राहत असतात. यादरम्यान त्यांना जेवणासंबंधित अनेक अडचणी येतात. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही कधीही, कुठेही खाद्यपदार्थ ऑर्डर करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त