आरोग्याची काळजी घेणारे सर्वात ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ स्मार्ट Device, जाणून घ्या फीचर्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्याचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यासाठी लोक अलीकडे योगा त्यासोबतच व्यायामाकडे वळाले आहेत. पण हे करताना आपण किती व्यायाम करतो आणि आपल्या शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम फिटनेस बँड करतो. तुम्ही झोपेत असताना सुद्धा हे फिटनेस बँड काम करत असतात. मात्र, सर्वांनाच महागडे स्मार्टवॉच परवडत नसते. म्हणून आज आम्ही तुम्हाला स्वतःत मस्त अशा काही फिटनेस बँडची माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

>> MI SMART BAND 4

Mi च्या या स्मार्टबँड मध्ये तुम्हाला अ‍ॅपलच्या स्मार्टवॉचप्रमाणे सर्व सुविधा मिळतील. त्यात तुम्हाला इनकमिंग कॉल, जीमेल आणि व्हाट्सअ‍ॅप सारख्या सुविधा वापरता येणार आहे. तसेच हृदयाचे ठोके, तुम्ही किती पावले चालले आहात हे सुद्धा मोजले जाणार आहेत. २००० ते ३००० हजार जर तुम्ही खर्च करण्यास तयार असाल तर हा बँड खूप ठरतो.

>> HONOR BAND 5

या बँड तुम्हाला हृदयाचे ठोके, किती पावले चालला आहात हे मोजले जाईल. तसेच TruSleep, TruSense यांसारखी सुविधा मिळणार आहे. त्याचसोबत अँड्रॉइड आणि आयओएस सिस्टीमवर हे बँड चालते. २२९९ रुपयांत तुम्ही हा बँड खरेदी करु शकता.

>> SAMSUNG GALAXY FIT E

या स्मार्टबँड मध्ये तुम्हाला walking, running and dynamic workout अशा तीन सुविधा मिळतील. हृदयाचे ठोके सुद्धा यामध्ये मोजले जाणार आहे. त्यासोबत स्विमिंग करताना सुद्धा तुम्ही हा बँड घालून तुमच्या हृदयाचे ठोके मोजू शकतात. २,५९९ रुपयांना तुम्ही हा बँड विकत घेऊ शकता.

>> REALME BAND

तुम्ही पायी व्यायाम करताना, सायकल चालवताना आणि कोणत्याही प्रकारची चढाई करताना Realme Band वापरु शकता. तसेच व्हाट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखी सोशल मीडिया अॅप सुद्धा यामध्ये वापरु शकता. १४९९ रुपयांमध्ये तुम्ही हा बँड खरेदी करु शकता.

>> GOQII VITAL ECG ACTIVITY TRACKER

इतर स्मार्ट बँड प्रमाणे यामध्ये तुम्हाला हृदयाचे ठोके, तुमची पावले मोजता येणार आहे. WhatsApp, SMS, email आणि calls यासारखी सुविधा सुद्धा तुम्हाला वापरता येणार आहे. तसेच यात मार्गदर्शन करण्यात येणार असून nutritionist, personal trainer आणि wellness expert निवडता येईल. ३,३२४ रुपयांत हा बँड तुम्हाला खरेदी करता येणार आहे.