मुंबईकरांना मोठा दिलासा ! ठाकरे सरकारनं घेतले ‘हे’ 2 महत्त्वाचे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आता लवकरच बेस्ट बसेस (Best Bus) पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. यासाठी आता राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. राज्य सरकारनं याबाबत बेस्ट प्रशासनाला पत्रही दिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा (Local Train) बंद होती. यामुळं सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. याचा ताण बेस्ट बसेसवर पडत आहे. याशिवाय फिजिकल डिस्टंसिंग पाळलं जावं म्हणून बेस्ट पूर्ण क्षमतेनं चालवल्या जात नाहीत. परंतु आता बसेस पूर्ण क्षमतेनं चालवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय सरकारनं 25 ऑक्टोबरपासून राज्यातील जीम (Gym) सुरू करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. यामुळं जीम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. कंटेन्मेंट झोनमधील (Containment Zone)जीम मात्र बंदच राहणार आहेत. राज्य सरकारनं घेतलेले हे 2 निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचेही संकेत

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Namdevrao Wadettiwar) यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याचा निर्णय पुढील 2-3 दिवसात घेण्यात येईल अशी माहिती बुधवारी दिली. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून लवकरच लोकल प्रवासाबद्दल निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं.