Best Business | छोटा बिझनेस-मोठा नफा, दरमहिना 5 लाखापर्यंत होईल कमाई!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Best Business | आपण एखादी वस्तू खरेदी करतो, ती अनेकदा पुठ्ठ्याने बनवलेल्या बॉक्समध्ये पॅक केली जाते. आपण सामान काढून टाकल्यानंतर, हे कार्टन कचर्‍यात फेकतो. पण तुम्हाला या पुठ्ठ्याच्या बॉक्सच्या व्यवसायाबद्दल माहिती आहे का. वास्तविक, गेल्या काही वर्षांत देशभरात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. (Best Business)

 

छोट्या वस्तूंच्या ऑनलाइन डिलिव्हरीमुळे कार्टनचा वापर झपाट्याने वाढला आहे. मागणी वाढल्याने त्याचा व्यवसायही फायदेशीर ठरला आहे.

 

झपाट्याने वाढतेय कार्टन मार्केट
स्मार्ट वॉच असो, वा मोबाईल फोन, टीव्ही असो की शूज असो किंवा काचेच्या वस्तू आणि किराणा सामान असो, सर्व वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी फक्त पुठ्ठ्याचे खोके मुबलक प्रमाणात वापरले जात आहेत.

 

भारतातील ऑनलाइन व्यवसायाच्या विस्तारामुळे कार्टन्सचा व्यवसायही झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या वस्तूंच्या वितरणासाठी खास डिझाईन केलेल्या कार्टनचा वापर करतात. अशावेळी त्याची बाजारपेठही भरभराटीला येत असून या छोट्या व्यवसायातून महिन्याला मोठा नफा कमावता येतो. (Best Business)

 

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी करा या गोष्टी
कोणत्याही व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी, कठोर परिश्रम आणि समर्पण करण्यापूर्वी, व्यवसाय सुरू करणार्‍या व्यक्तीकडे त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती असणे आवश्यक आहे.

 

कार्टन उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, आपल्याकडे त्याच्या उत्पादनाशी संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगमधून कोर्स करून या व्यवसायाशी संबंधित आवश्यक गोष्टींची माहिती मिळवू शकता. या संस्थेत तीन महिने ते दोन वर्षांपर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

Licence ची गरज
भारतात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसायाची योग्य रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. कार्टनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही MSME रजिस्ट्रेशन किंवा उद्योग आधार रजिस्ट्रेशन करू शकता.

 

यातून तुम्हाला सरकारी मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त, तुम्हाला फॅक्ट्री लायसन्स, पॉल्यूशन सर्टिफिकेट आणि जीएसटी रजिस्ट्रेशनची आवश्यकता असू शकते.

 

Raw Materials लागेल
क्राफ्ट पेपरचा वापर प्रामुख्याने पुठ्ठ्याचे कार्टन्स बनवण्यासाठी केला जातो. तुम्ही जितका चांगला क्राफ्ट पेपर वापराल तितका तुमच्या बॉक्सचा दर्जा चांगला असेल. याशिवाय, पिवळा स्ट्रॉबोर्ड, गोंद आणि शिवणकामाची तार लागेल.

 

या मशिन्सद्वारे होईल काम
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला सिंगल फेस पेपर कोरुगेशन मशीन, रील स्टँड लाइट मॉडेलसह बोर्ड कटर, शीट पेस्टिंग मशीन, शीट प्रेसिंग मशीन, इसेन्ट्रिक स्लॉट मशीन यासारख्या मशीनची आवश्यकता असेल. तुम्ही या मशीन्स कोणत्याही बी2बी वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

 

व्यवसायात करावी लागेल इतकी गुंतवणूक
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 5,500 चौरस फूट जागा लागेल.
जर तुमच्याकडे आधीच एवढी जमीन असेल, तर तुम्हाला मशीन्सचा खर्च करण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल.

 

सेमी ऑटोमॅटिक मशिनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला सुमारे 20 लाख रुपये खर्च करावे लागतील.
पूर्ण-स्वयंचलित मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला सुमारे 50 लाख रुपये खर्च येऊ शकतो.

दर महिना होऊ शकते इतकी कमाई
या व्यवसायात नफ्याचे प्रमाण खूप चांगले आहे. दुसरीकडे मागणीही कायम आहे.
जर तुम्ही चांगल्या ग्राहकांशी करार केलात तर दरमहा 4 ते 6 लाख रुपये सहज कमावता येतील.

 

Web Title :- Best Business | best business idea cartoon business can be highly profitable and would be able to earn 5 lakh per month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

 

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

 

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

 

BSNL Recharge Plan | BSNL चा असा रिचार्ज प्लान पाहिला नसेल! केवळ 107 रुपयात भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणखी अनेक सुविधा