फक्त 5-10 हजार रूपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल चांगली ‘कमाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज अनेक लोक नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यावर भर देत असतात. आज अनेक जण व्यवसाय सुरु करु इच्छित आहेत. असे अनेक व्यवसाय आहे की ज्यामुळे तुमचे भविष्य सुधारु शकते. या व्यवसायासाठी तुम्हाला लाखो रुपये नाही तर १० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या थोड्याशा गुतंवणूकीत तुम्ही अधिक कमाई करु शकतात.

१) आता बाजारात बूटे, शुज यांच्या सफाई करण्याच्या मशीन आल्या आहेत. लोक फक्त कपडे नाही तर बुट देखील लॉन्ड्रीला देतात. या कामाला सुरुवात झाल्यापासूनच तुम्ही चांगली कमाई करु शकतात.

२)  तुम्ही तुमचे मोबाइल रिचार्ज आणि सिम कार्डचे दुकान देखील सुरु करु शकतात. यात तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत गुतंवणूक करावी लागेल. याची विशेषता म्हणजे याची मागणी कायम असते. यासाठी लागणारे शॉप तुम्ही तुमच्या घरात देखील सुरु करु शकतात.

३)  प्रिंटर आणि झेरॉक्सचा व्यवसायात देखील तुम्ही अधिक कमाई करु शकतात. कमी गुंतवणूकीत तुम्ही अधिक नफा कमावू शकतात. यासाठी तुम्ही शाळा, कॉलेजजवळ हा व्यवसाय सुरु करु शकतात आणि कमाई करु शकतात.

४) घर बसल्या तुम्ही टेलरिंगचे काम देखील सुरु करु शकतात. हा पर्याय तुमच्यासाठी अत्यंत उत्तम ठरेल. हे काम महिला चांगल्या प्रकारे करु शकतात. यात तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. कामात सातत्य राखल्यास तुम्हाला प्रतिदिन चांगला फायदा होईल.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like