2021 मधील सर्वोत्तम दिवस, ‘या’ तारखेला करा शुभ अन् महत्वाची कामे

पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना संकटामुळे 2020 मध्ये अनेकांची शुभ आणि महत्वाची कामे अडकून पडली आहेत. अशी कामे पूर्ण करण्यासाठी 2021 मध्ये शुभ दिवस आले आहेत. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षात काही खास तारखांना शुभ काम केल्यास यश मिळण्याची अधिक शक्यता आहे. जर तुम्ही गृह प्रवेश, नवीन व्यवसाय, स्टार्टअप, नवीन नोकरी, जमीन किंवा घर घेण्याबाबत विचार करत असाल तर सर्व 12 महिन्यांत अनेक शुभ तारखा आहेत. या तारखा दिवशी शुभ कामे केल्यास निश्चितच लाभ होईल.

जानेवारी : 2021 मधील पहिल्या जानेवारी महिन्यात 5, 6 , 8 ,14, 17, 26, 30 या तारखा सर्वात शुभ आहेत. या तारखांवर आपण दुकान किंवा घराशी संबंधित कोणतेही शुभ कार्य करू शकता.

फेब्रुवारी : 12, 14, 16, 20, 23, 28 फेब्रुवारी या सर्वात शुभ तारखा मानल्या आहेत. या तारखांवर हवन, पूजन किंवा गृह प्रवेश संबंधित काम करणे चांगले राहणार आहे.

मार्च : 8, 9, 14, 20, 21, 24 आणि 26 मार्च हे सर्वात शुभ दिवस आहेत. या कोणत्याही तारखेला तुम्ही कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करू शकता.

एप्रिल : ज्योतिषांच्या मते एप्रिलमध्ये फक्त तीन शुभ तारखा असतील. तुम्ही कोणतेही शुभ कार्य 1, 11 आणि 20 एप्रिल रोजी पूर्ण करायला हरकत नाही.

मे : 6, 8, 10, 12, 16, 18, 20, आणि 21 मे या तारखा सर्वात शुभ आहेत. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित करारनामा करण्यासाठी या तारखा खूप शुभ ठरणार आहेत.

जून : 2, 3, 10, 12, 15, 16, 21, 22, 25, 27 जून या तारख देखील शुभ तारखा आहेत. घरामध्ये वाहन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी योग्य तारखा शुभ मानल्या आहेत.

जुलै : 3, 4, 13, 25, 20, 22, 25, 26 आणि 31 जुलै या सर्वात शुभ तारखा असतील.

ऑगस्ट : 6, 7, 8, 9, 12, 16, 20, 27, आणि 28 ऑगस्ट या सर्वात शुभ तारखा आहेत. या तारखांवर आपण कोणतेही शुभ कार्य करू शकता.

सप्टेंबर : 2, 4, 8, 13, 14, 17, 20 , 22, 25, 26, 29 सप्टेंबर या तारखा शुभ कार्ये मार्गी लावण्यासाठी योग्य आहेत.

ऑक्टोबर : 1, 9, 10, 12, 14, 18, 21, 23, 25, 26 ऑक्टोबर या सर्वात शुभ तारीखा असणार आहेत.

नोव्हेंबर : 2, 8, 10, 11, 12, 20, 22, 23, 24, 26 नोव्हेंबर या तारखा सर्वात शुभ असतील. लग्नाच्या बाबतीत या तारखा सर्वात शुभ ठरतील.

डिसेंबर : शेवटच्या महिन्यातील 4, 5, 10, 13, 15, 18, 19, 22, 25, 31 डिसेंबर या तारखा सर्वात शुभ दिवस असतील.