Best Detox Drink | ‘हे’ पेय तुमच्यासाठी ठरू शकतं उपयुक्त; जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम – सणासुदीच्या काळात आपण इच्छा नसतानाही अनेक प्रकारच्या आरोग्यास अपायकारक असलेल्या गोष्टींचे सेवन करतो. यानंतर शरीराला डिटॉक्स (Detox) करणं अत्यंत गरजेचं मानलं जातं. सकाळी काही पेयांचे सेवन (Best Detox Drink) करणे आपल्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. हे आपल्याला पोट साफ करण्यास आणि शरीरातून अतिरिक्त साखर आणि कचरा बाहेर काढून टाकण्यास मदत करते (Best Detox Drink).
आरोग्य तज्ञांच्या मते, नियमितपणे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उपाय केले पाहिजेत. अन्न अशुद्धी, शरीरात साठवलेली अतिरिक्त चरबी, शर्करा (Food Impurities, Body Excess Fat, Sugar) या गोष्टी शरीरात जमा झाल्याने यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) यासारख्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. यामध्ये कोणते पेय सेवन करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते? (Best Detox Drink)
लिंबूपाणी अत्यंत गुणकारी (Lemonade Is Very Beneficial) –
लिंबू-पाणी पिणं विशेष फायदेशीर आहे. सणाच्या दुसर्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू-पाणी (Lemonade) पिणे खास फायदेशीर ठरू शकतं. शरीरातून विषाक्तता काढून टाकण्यासाठी आणि वजन कमी करण्यात या पेयाचा उपयोग आहे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू (Lemon) पिळून त्यात एक इंच किसलेले आले घालावे. या ड्रिंकचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Beneficial For Health) ठरू शकते. आल्यामध्ये जिंजरॉल असते, त्यामुळक पोटाच्या समस्या दूर होण्यास आणि पाचन प्रक्रिया (Digestive Process) सुधारण्यास मदत होते. तर लिंबात केवळ व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) नसते तर ते अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) देखील असतात. त्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.
जिर्याचे पाणी प्या (Drink Cumin Seeds Water) –
शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी जिर्याच्या पाण्याचे सेवन करणे देखील विशेषतः फायदेशीर ठरू शकते. जिर्याचे पाणी सर्व विषारी पदार्थ (Toxic Substances) बाहेर काढून आपल्या शरीरास डिटॉक्सिफाय करण्यास उपयुक्त आहे. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिर्याचे पाणी पिणे देखील विशेषतः फायदेशीर ठरू शकते.
काकडी-पुदिन्याचे पेय (Cucumber-Mint Drink) –
काकडी आणि पुदिन्यापासून तयार केलेले पेय केवळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो असे नाही. तर, ते चवीलाही चांगले आहे.
हे पेय तयार करण्यासाठी एका भांड्यात ताज्या पुदिन्याच्या पानांसह काकडीचे काही काप ठेवा. दिवसभर ते खात राहा.
काकडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात आणि
त्याच्या हायड्रेटिंग (Hydrating) प्रभावामुळे ते शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Best Detox Drink | best detox drink for body cleanse healthy drinks for body purifying
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या
Blood Sugar कंट्रोल करण्यात प्रभावी आहे सत्तू, ‘या’ पध्दतीनं करावं सेवन, जाणून घ्या