देशातील ‘या’ 5 बँकांकडून FD वर मिळतोय जास्तीचा ‘फायदा’, जाणून घ्या नवे व्याज दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिक्स्ड डिपॉजिट ( FD) हा गुंतवणूकीसाठी नेहमीच एक सुरक्षित पर्याय आहे. दोन, तीन आणि पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉजिटवर कोणती बँक सर्वाधिक व्याज देते याविषयी जाणून घ्या-

दोन वर्षांच्या फिक्स्ड डिपॉजिटवर IDFC फर्स्ट बँक सर्वाधिक व्याज देत आहे. दोन वर्षांच्या फिक्स्ड डिपॉजिटवर IDFC 8%, RBL 7.65% आणि DCB 7.50% या सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या पहिल्या तीन बँका आहेत.

तीन वर्षांच्या फिक्स्ड डिपॉजिटवर DCB बँक सर्वाधिक व्याज देत आहे. 10 हजाराच्या गुंतवणुकीवर DCB 8% व्याजदरानुसार 12682 रुपये, AU स्मॉल फायनान्स 7.77% व्याजदरानुसार आणि लक्ष्मीविलास बँक 7.50% व्याजदरानुसार 12497 रुपये देईल.

पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉजिटवर DCB बँकदेखील मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे. 10 हजारांच्या गुंतवणूकीवर DCB 7.75% व्याजदरानुसार 14678 रुपये, IDFC 7.50% व्याजदरानुसार 14499 आणि RBL बँक 7.50% व्याजदरानुसार 14499 रुपये देईल.

Visit : Policenama.com