हार्ट ठेवायचे असेल मजबूत, तर डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टींचा आवश्यक करा समावेश; जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन फुफ्फुसांसह हार्टवर सुद्धा वाईट परिणाम करत आहे. रिपोर्टनुसार, कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर सुद्धा हार्टसंबंधी रोग होण्याचा धोका जास्त आहे. हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी रोज योग, प्राणायाम करू शकता. सोबतच अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे फुफ्फुसांसह हृदयसुद्धा निरोगी राहील. अशाच काही गोष्टी जाणून घेवूयात…

लसून
लसणातील एलीसिन तत्व हार्टच्या आर्टिज्म साफ करण्यासह ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यात मदत करते. रोज 3-4 लसून पाकळ्या रिकाम्यापोटी सेवन करा. जास्त तिखट वाटत असेल रात्री पाकळ्या पाण्यात भिजवून सकाळी खा.

दालचीनी आणि अर्जुन साल
या दोन्ही गोष्टी हार्ट निरोगी ठेवण्यासाठी उत्तम मानल्या जातात. रोज दालचीनी आणि अर्जुनच्या सालीचा काढा प्या. यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोल राहील, यामुळे हृदय निरोगी राहील. हाडे मजबूत होतील. हार्टचे ब्लॉकेज साफ होण्यास मदत होईल.

आळशी
आळशीत मोठ्या प्रमाणात 3 फॅटी अ‍ॅसिड, फायबर, व्हिटॅमिन बी1, बी6 मॅग्नेशियम, सेलेनिमय, प्रोटीन, आयर्न, पोटॅशियम, कॉपर आणि झिंक इत्यादी तत्व आढळतात. यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुण असल्याने हार्टसह शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. रोज आळशीचे सेवन करा. तव्यावर हलक्या भाजून सेवन करा.

तुळस
तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक, आयर्न, क्लोरोफिल, सिट्रिक, टारटरिक, मॅलिक अ‍ॅसिड आढळते, ज्यामुळे हार्ट निरोगी राहते. ब्लड शुगर, ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.

दुधी भोपळा
दुधी भोपळ्याचे आयुर्वेदात खुप महत्व आहे. विविध तत्वांसह भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्याने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात मदत होते. ज्यामुळे हार्ट सुद्धा निरोगी राहते. ब्लड- शुगर, वजन नियंत्रित करते.