फक्त बीट अन् गाजरच नव्हे तर घरातील ‘हे’ पदार्थीही लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी ठरतात फायदेशीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पूर्वजांनी असा तर्क लावला होता की, शरीरामधील एखाद्या धातुघटकाशी निसर्गातील एखाद्या पदार्थाचं साम्य असेल तर तो पदार्थ तो शरीरघटक वाढवण्यास उपयुक्त होऊ शकतो. त्यानुसार रक्त हे लाल आणि लालसर काळ्या रंगाचं आहे. म्हणून निसर्गातील जो जो घटक लाल रंगाचा, लालसर किंवा काळसर व तपकिरी रंगाचा असेल तो रक्तवर्धक होईल असा अनुमान प्रमाणावर आधारीत निष्कर्ष प्राचीन काळात पूर्वजांनी काढला.

पूर्वजांच्या या निष्कर्षानुसार, लालसर काळ्या पानांची माठाची भाजी, काळसर रंगाची पिकलेली करवंदे, काळा मनुका, लालसर अहळीव (हलीम), काळ्या रंगाचे कारळे, काळे तीळ, काळसर तपकिरी रंगाचे खजूर, लालरस तपकिरी रंगाची तांदळाची तुसे, तांबूस रंगाचे आमचूर चूर्ण, लाल चणे, पांढऱ्या काळ्या रंगाची चवळी, लालसर काळ्या रंगाची अळूची पाने, तांबूस रंगाचा कमळकंद, तपकिरी रंगाचा आळूचा कंद, तपकिरी काळसर रंगाचे केळफूल, गडग काळ्या रंगाची पिवळी वगैरे पदार्थ रक्तवर्धक आहेत.

विशेष गोष्ट ही की, हा तर्क प्रत्यक्षातही शरीरामधील लोह व पर्यायानं रक्त वाढवणारा आहे. म्हणजे असं वर सांगितल्याप्रमाणे सर्वच पदार्थांमध्ये लोह (आयर्न) हे तत्व मुबलक प्रमाणात असतं. करवंदांपासून लालमाठापर्यंत आणि अहळीवापासून आमचूरापर्यंत सर्वच लाल-काळ्या रंगाचे पदार्थ रक्तवर्धक असतात. कारण त्यांच्यात लोह भरपूर प्रमाणात असतं.

कोणत्या पदार्थात किती प्रमाणात लोह मिळतं (100 ग्रॅम पदार्थामधील लोहाचं प्रमाण मिलीग्रॅममध्ये दिलं आहे.)

लोहाची दिवसाची गरज – सरासरी 30 मिलीग्रॅम

तांदळाची तुसे – 35 मिलीग्रॅम

चण्याची पाने – 23.8 मिलीग्रॅम

लाल चणे (भाजलेले) – 9.5 मिलीग्रॅम

अळूची पाने – 10 मिलीग्रॅम

चवळीची पाने – 20 मिलीग्रॅम

माठाची पाने – 38.5 मिलीग्रॅम

बीट – 1.19 मिलीग्रॅम

गाजर – 1.03 मिलीग्रॅम

करवंदे (सुकी) – 39 मिलीग्रॅम

खजुर सुके – 7.3 मिलीग्रॅम

कमळाचे देठ – 60.6 मिलीग्रॅम

अहळीव दाणे – 100 मिलीग्रॅम

कारळे -बिया – 56.7 मिलीग्रॅम

आमचूर पावडर – 45.2 मिलीग्रॅम

पिंपळी – 62 मिलीग्रॅम

वर दिलेल्या यादीत बहुतेक पदार्थ लालसर-तांबूस किवा काळसर रंगाचे आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. परंतु नीट निरीक्षण देऊन वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की, ज्या गाजर-बीटाचा रक्तवर्धनासाठी उत्तम म्हणून फार प्रचार केला जातो. त्या तुलनेत अस्सल भारतीय खाद्यपदार्थ कितीतरी अधिक प्रमाणात शरीराला लोह पुरवतात.

बीटामधून अल्प प्रमाणात लोह मिळत, नाही असं नाही. मात्र जी फळे आणि भाज्या अस्सल देशी आहेत, याच मातीतील आहेत ती आपल्या शरीरासाठी अधिक सात्म्य असणार नाही का? तेव्हा रक्त वाढवण्यासाठी या काळ्या लालसर वर्णाच्या आहाराचं सेवन करा.

रक्त वा हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी ज्या गोळ्या कॅप्सुल वगैरेचं तुम्ही सेवन करता ते अनेकांना मलावरोधास व मळमळ होण्यास कारणीभूत होते, तसं या नैसर्गिक पदार्थांबाबत होत नाही.

गोळ्या- कॅप्सुल्सचे अतिसेवन त्रासदायक होऊ शकते, मात्र या पदार्थांचं अतिसेवन झालं तरी त्यांचा शरीराला धोका होणार नाही.

जो जो खाद्यपदार्थ रक्त वा कृष्णवर्णीय असतो, तो तो रक्तवर्धक असतो. हा आपल्या प्राचीन पूर्वजांच्या निरीक्षणावर आधारीत अनुमानजन्य निष्कर्ष वास्तवातही सत्य आहे, हे इथं लक्षात येते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.