आवळा, लसूनच्या सेवनाने होईल व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण, पोषकतत्वांच्या कमतरता पूर्ण करतील ‘हे’ फूड्स; जाणून घ्या

नवी दिल्ली : चुकीची जीवनशैली आणि खाण्या-पिण्यामुळ शरीराचे मोठे नुकसान होते. शरीरात व्हिटॅमिन, मिनरल्स, कॅल्शियम इत्यादी सारखी पोषकतत्व खुप आवश्यक असतात. पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. तसेच इम्युनिटीसुद्धा कमजोर होते.

शरीरात व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक मोठे रोग होतात. यासाठी वेळीच या व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करा. सध्या बहुतांश लोकांना हे समजत नाही की, अखेर एका निरोगी शरीरात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, कॅल्शियमसह इतर तत्व कोणत्या प्रमाणात असावेत. यासोबत कोणत्या फूडमधून मिळेल कोणते व्हिटॅमिन ते जाणून घ्या.

निरोगी शरीरात किती मात्रेत असावीत पोषकतत्व
* व्हिटॅमिन डी- 400 इंटरनॅशनल युनिट
* व्हिटॅमिन के – 55 मायक्रोग्राम
* व्हिटॅमिन बी12- 1 मायक्रोग्रॅम
* कॅल्शियम- 1 ग्रॅम
* आयर्न- 17 मिलीग्रॅम
* व्हिटॅमिन सी- 40 मिलीग्रॅम
* झिंक- 14 मिलीग्रॅम
* ओमेगा फॅटी अ‍ॅसिड- 800 मिलीग्रॅम-1 ग्रॅम
* व्हिटॅमिन के- 55 मायक्रोग्रॅम
* प्रोटीन- एका व्यक्तीच्या वजनानुसार प्रतिदिन प्रोटीन घ्यावे. जसे की 60 किलो वजनाच्या व्यक्तीने रोज 60 ग्रॅम प्रोटीन घ्यावे.
* मॅग्नेशियम- 350 ग्रॅम

कोणत्या फूडमधून मिळेल कोणते व्हिटॅमिन आणि मिनरल्स

व्हिटॅमिन डी
याच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात, अ‍ॅनिमिया, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. रोज सकाळी अर्धा ते एक तास उन्हात बसा. तसेच डाएटमध्ये मशरूम, गुच्छी, अळशी, अंकुरित धान्य सेवन करा.

व्हिटॅमिन बी12
व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर अ‍ॅनिमिया, बद्धकोष्ठता, मेंदूचे आजार, अतिसार, चिडचिडेपणा, थकवा इत्यादी समस्या होतात. यासाठी मका, मोरिंगा, मांस, मासे, दूध, अंडे सेवन करा.

कॅल्शियमची कमतरता
याच्या कमतरतेमुळे सांधेदुखी, अर्थरायटिस, हाड तुटणे इत्यादी समस्या होऊ शकतात. यासाठी दूध, दही, पनीर, लसूनचे सेवन करा.

आयर्न
शरीरात हीमोग्लोबिन तयार होण्यासाठी आयर्न आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे योग्य प्रमाणात ऑक्सीजन मांसपेशीपर्यंत पोहचत नाही. यामुळे थकव्यासह अनेक समस्या होतात. यासाठी जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या सेवन करा.

व्हिटॅमिन सी
याच्या कमतरतेमुळे इम्युनिटी कमजोर होते आणि अनेक आजार होऊ शकतात. यासाठी आवळा, रोजी हिप्स, एलोवेरा, गुळवेल यांचे सेवन करा.

झिंक
झिंकमुळे इम्यूनिटी बूस्ट होते, ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते, स्कीन आणि केस निरोगी राहतात. जखम लवकर भरून येते. याच्यासाठी भोपळा, लसून सेवन करावा.

प्रोटीन
शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास ब्लड शुगर कमी होते, वारंवार ताप, कुपोषण इत्यादी समस्या होतात. यासाठी स्प्रूनला, डाळ, सोया, पनीर, दही इत्यादी सेवन करा.

व्हिटॅमिन ई
शरीरात व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे मांसपेशी खुप कमजोर होतात, जास्त थकवा, डोळ्यांची दृष्टी कमी होते. यासाठी सोया, बदाम, सूर्यफुलाच्या बिया, पालक, ब्रोकली सेवन करा.

व्हिटॅमिन के
याच्या कमतरतेमुळे सर्जरी किंवा जखम झाल्यास जास्त ब्लिडिंग होऊ शकते. योबतच हाडे कमजोर होणे, इत्यादी समस्या होतात. यासाठी गाजर, हिरव्या भाज्या, अंडे, मांस, मासे, ब्रोकली, कोबी, फ्लॉवर, पालक सेवन करा.