Best Foods For Joint Pain : थंडीमध्ये सांधेदुखीचा होतोय त्रास तर आहारात समाविष्ट करा ‘या’ 4 गोष्टी, मिळेल आराम, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि विषाणूचा याशिवाय अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वृद्ध लोकांमध्ये सांधेदुखीची समस्या उद्भवते; पण आजच्या काळात केवळ वृद्धच नाही, तर तरुणदेखील अशा प्रकारच्या समस्यांपासून ग्रस्त आहेत. हिवाळ्यात कमकुवत हाडे, सांधेदुखी, शरीरात वेदना या समस्या उद्भवतात. हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केले पाहिजे. हिवाळ्यात सांध्यातील वेदना कमी करण्यासाठी बरेच लोक औषधे आणि मालिश करतात. परंतु, या औषधाशिवाय अन्न आणि घरगुती उपचारांचा अवलंब केल्यास आपल्याला शरीराच्या दुखण्यापासून आणि सांध्यातील वेदनापासून आराम मिळू शकतो. जाणून घ्या…

१) कोशिंबीर
कोशिंबीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते, हे तुम्हालाही माहीत आहे. पेरूची कोशिंबीर सांध्याच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. चीजबरोबर पेरूचे सेवन केल्यास कॅल्शियमची कमतरता दूर होते. जे हिवाळ्यात होणाऱ्या सांध्यातील वेदनापासून आराम देते.

२) सूप
हिवाळ्यामध्ये गरम सूप पिण्यामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. सूप शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. ब्रोकोली आणि बदाम सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. कॅल्शियम, ओमेगा ३ फॅटी ॲसिडस् आणि बरीच पौष्टिकता ब्रोकोली आणि बदामांमध्ये आढळतात. ज्यामुळे हाडे मजबूत होऊ शकतात.

३) पेय
हाडे मजबूत करण्यासाठी आणि सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी आपण हिवाळ्याच्या काळात पेय घेऊ शकता. परंतु, कोणत्या गोष्टीपासून बनविलेले पेय घ्यावे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. संत्री, गाजर आणि आल्यापासून बनविलेले पेय पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरीसह कॅल्शियमची देखील चांगली मात्रा आढळते जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.

४) हळद-दूध
हिवाळ्याच्या हंगामात हळदीचे दूध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हळदीमध्ये आढळणारी अँटी-इंफ्लेमेटरी आणि दुधात असलेले कॅल्शियम गुणधर्म सांधेदुखीपासून आराम देतात.