दातांची समस्या आहे का ? ‘हे’ घरगुती उपाय कराच, मग बघा कमाल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अनेकदा अचानक दात कमजोर होतात म्हणजे दात हलतात. वाढत्या वयाच्या किंवा कमी वयाच्या दातांचं हलणं तुम्हाला कदाचित चिंता देऊ शकतं. अनेकदा दातांचं हलणं याला हिरड्यांची एखादी समस्या कारणीभूत असू शकते. तसेच पॅरीयोडोंटम नावाच्या या आजारानेही दात कमजोर होऊन हलतात. अनेकदा दातांच्या आजूबाजूचे टिशू सैल होतात आणि त्यामुळे दात हलू लागतात.
दात हलत असल्याने काहींना टणक किंवा कडक पदार्थ खाण्याची भिती वाटू लागते. कारण अशावेळी दात तुटण्याची शक्यता असते. या समस्येपासून सुटका करुन घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. हे घरगुती उपाय वापरून तुम्ही तुमच्या दातांची समस्या दूर करु शकता.

1. मिठासोबत मोहरीचं तेल

मीठ आणि मोहरीचं तेल तुमची दात सैल होण्याची किंवा दात हलण्याची समस्या दूर करू शकतं. यासाठी थोडं मीठ घ्या आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाकून याने दात स्वच्छ करा. मीठ हे आयुर्वेदात तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं आहे. मिठात अँटी-सेप्टिक गुण असतात. अशातच तुम्ही मिठाच्या पाण्याने गुरळा देखील करू शकता. याने हिरड्यांना सूज येण्याची समस्या दूर होते.

2. काळे मिरे आणि हळद

काळे मिरे आणि हळदीचा वापर करून तुम्ही दातांमधील बॅक्टेरियाचा सफाया करू शकता. याने हिरड्याही मजबूत होतात. दोन्ही पदार्थ समान प्रमाणात घ्या. हे दातांवर लावा आणि दातांवर फिरवा. याने तुमची दात हलण्याची समस्याही दूर होईल.

3. हिरव्या भाज्यांचे सेवन

तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात जेवढं शक्य असेल तेवढ्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा. हिरव्या भाज्यांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असतात जे इम्यून सिस्टीमला मजबूत करतात. हिरव्या भाज्या खाल्ल्याने इन्फेक्शनही होत नाही आणि दातांची मुळं मजबूत होतात. लहान मुलांचीही दातं अनेकदा हलतात, त्यांच्यावरही या उपायांचा वापर तुम्ही करु शकता.

4. अ‍ॅसिड कमी घ्या

अ‍ॅसिडयुक्त पेय अथवा पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात केल्याने दात सैल होण्याची समस्या होते. यामुळे असे पदार्थ किंवा पेयांचे सेवन बंद करा. यामध्ये सॉफ्ट ड्रिंक, सोडा, कोल्डड्रिंक यांचे सेवन बंद करा.