ओठांच्या सौंदर्यासाठी खास 4 टीप्स ! ‘असा’ दूर करा काळेपणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकजण ओठांच्या विविध समस्यांनी त्रस्त असतात. ओठांची त्वचा निघणे, ओठ कोरडे पडणे अशा समस्या काहींना असतात. याशिवाय काहींना ओठांना काळेपणा (black spots)  असतो. विविध उपचार करूनही कधी कधी फायदा मिळत नाही. आज आपण या समस्या दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) बदामाचं तेल – या तेलात पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. यात ब्लिचिंग एजंटही असतात. यामुळं ओठांवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. बदामाचं तेल हातावर घेऊन या तेलानं हलक्या हातानं मसाज करा. हे तेल रात्रभर असंच ठेवा. नियमित हा प्रयोग केला तर नक्कीच फरक दिसून येईल.

2) लिंबू आणि मध – एक चमचा लिंबाच्या रसात 1-2 थेंब मध टाकावं. हे मिश्रण एकजीव करून 10 मिनिटे ओठांवर लावा. त्यानंतर गार पाण्यानं ओठ पुसून घ्या. हा प्रयोग दिवसातून दोन वेळा करावा. लिंबू आणि मधात अँटीसेप्टीक गुण आणि ब्लिचिंग एजंट असतात. त्यामुळं मध आणि लिबाचा लेप ओठांवर लावला तर आर्द्रता टिकून राहते. याशिवाय ओठांवरील काळेपणा दूर होतो.

3) शुगर स्क्रब – 1 चमचा साखरेत लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावेत. त्यानंतर या मिश्रणानं 3-4 मिनिटे ओठांवर स्क्रब करावं. आठवड्यातून 2-3 वेळा हा प्रयोग करावा. या लेपामुळं ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. स्क्रब आपल्या ओठांना एक्सपोलिएट करतं.

4) काकडीचा रस – त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा काकडीचा वापर केला जातो. ओठांसाठीही त्याचा खूप फायदा होतो. काकडीचा रस काढून 10 ते 15 मिनिटे ओठांवर लावून ठेवावा. त्यानंतर गार पाण्यानं ओठ धुवावेत. दिवसातून 2 वेळा हा प्रयोग करावा. काकडीत ब्लिचिंग आणि हायड्रेटींगची मात्र मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यामुळं ओठांवरील आर्द्रताही कायम राहते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.