लग्न समारंभादरम्यान ‘या’ 9 गोष्टी कायम लक्षात ठेवा ! अन्यथा पोलिस करतील अटक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : लग्नाचा हंगाम सुरू होणार आहेत. जर आपणही या हंगामात मॅरेज हॉल किंवा फार्महाऊसमध्ये लग्नाची योजना आखत असाल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. वास्तविक, नुकताच नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (National Green Tribunal) ने एक महत्वाचा निर्णय घेतला असून त्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कोणतेही मॅरेज हॉल, फार्महाऊस किंवा बॅन्क्वेट हॉल बुक करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घ्याव्यात. या संदर्भात एनजीटीने केंद्रीय प्रदूषण मंडळाला मसुदा तयार करण्यास सांगितले आहे. जर आपण विवाहसोहळ्याच्या निमित्ताने डीजे किंवा लाउडस्पीकरची व्यवस्था करण्याची तयारी करत असाल तर नक्की एकदा यावर विचार करा.

(1) रात्री 10 नंतर डीजे आणि लाऊड स्पीकर वाजविण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच जास्तीत जास्त आवाजाची मर्यादा ही 75 डेसिबलवर सेट केली गेली आहे.

(२) एनजीटीच्या निर्देशानुसार अशा ठिकाणी जेथे उत्सव आयोजित केला जातो तेथे नियमांचे पालन करण्याविषयी डेटा प्रकाशित केला जाईल.

(3) जर एखाद्या फार्महाऊसमध्ये आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केले जात असेल तर दिल्ली पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

(4) सुका आणि ओला कचरा वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये गोळा करण्याची तरतूद केली पाहिजे.

(5) कोणत्याही समारंभात आयोजित केलेल्या महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य आहे. याचे रेकॉर्डिंग बँक्वेट हॉल, फार्महाउसच्या मालकाकडे असले पाहिजे.

(6) मेन एंट्रेंसवर एकूण गेस्टची संख्या आणि पार्किंग स्पेस बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तसेच फिक्स्ड पार्किंग फॉर्मुला तयार करून त्याचे अनुपालन करणे गरजेचे आहे.

(7) पार्किंग स्पेस शिवाय रोडवर कुठेही गाड्यांची पार्किंग करण्याची परवानगी नाही.

(8) जर कोणत्याही बैंक्वेट हॉल किंवा फार्महाउसवर या नियमांचे पालन होत नसेल तर त्यांचे संचालन त्वरित थांबवावे लागेल.

(9) याव्यतिरिक्त, एनजीटीने सर्व राज्य प्रदूषण मंडळाला संबंधित राज्य अधिकाऱ्यांशी बोलण्याचे आणि वरील मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्याचे आदेश दिले आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/