दररोज फक्त 100 रूपयांची बचत करून मिळवा 20 लाख, खुपच फायद्याचा ‘हा’ प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाई वाढ चालली आहे, त्यामुळे पैशांची बचत होणे कठीण झाले आहे. कोणत्याना कोणत्या कारणाने ते खर्च मात्र होतात. बँकेत देखील एफडीवर व्याज कमी मिळते. परंतू असाही एक प्लॅन आहे ज्यात तुम्ही रोज 100 रुपये गुंतवू शकतात आणि 20 लाख रुपये जमा करु शकतात.

जर तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये रोज 100 रुपये म्हणजे महिन्याला 3000 किंवा 3100 रुपये जमा केले तर तुम्ही 15 वर्षांनी फक्त 6 ते 7 लाख रुपये फंड जमवू शकतात. काही म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करुन एका वर्षात 15 – 16 टक्के परतावा मिळवू शकतो. जर 15 वर्ष एसआयपी केले आणि महिन्याला 3000 रुपये गुंतवले तर दर वर्षाला 15 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळेल, त्यामुळे तुम्ही 20 लाख रुपये जमा करु शकतात.

या प्लॅनमध्ये तुम्ही जवळपास 5.5 लाख रुपये गुंतवतात त्यावर 15 टक्के परताव्याच्या हिशोबाना 15 वर्षात 20 लाख रुपये मिळवतात. यामुळे ही योजना मोठी फायदेशीर ठरते.

येथे गुंतवणूक करणं ठरु शकतं फायदेशीर
फ्रॅंकलिन इंडिया प्राइमा फंड मध्ये तुम्ही वर्षाला 14.6 टक्के परतावा मिळवू शकतात. एल अ‍ॅण्ड टी मिडकॅपमध्ये तुम्ही 14.5 टक्के तर एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त 15.7 टक्के रिटर्न मिळेल.

SIP म्हणजे सिस्टेमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅन. या प्लॅनमध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाने लाभ मिळतो. अर्थात पहिल्या महिन्यात तुमचा फायदा पुढच्या महिन्याचा एकूण रक्कमेबरोबर जोडला जातो. त्यामुळे तुमची गुंतवणूक वाढते. एसआयपीचा कालावधी जितका जास्त त्याचा फायदा देखील तेवढाच. त्यामुळे जास्त कालावधीसाठी एसआयपी जास्त परतावा देते.

एसआयपीमध्ये वेळच्या वेळ गुंतवणूक करण्याची एक सोपी पद्धत आहे. ज्या माध्यमातून तुम्ही 500 रुपये प्रति महिना या हिशोबाने गुंतवणूक करु शकतात. म्हणजेच तुमच्या उत्पन्नावर विना कोणत्याही माहिन्याचा बोज्याशिवाय तुम्ही गुंतवणूक करु शकतात. गुंतवणूकीची रक्कम कमी का असेना परंतू जास्त काळाच्या गुंतवणूकीनंतर जास्त परतावा मिळतो.

Visit : Policenama.com