Best Investment Plan | ‘इथं’ तुम्हाला 1,000 रुपयांच्या बचतीवर मिळतील पूर्ण 18 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ सुरक्षित स्कीमबाबत सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Best Investment Plan | जर तुम्ही सुद्धा गुंतवणुकीची योजना (Best Investment Plan) बनवत असाल तर तुमच्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सर्वात चांगला पर्याय आहे. हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित समजले जाते. सोबतच यामध्ये चांगले रिटर्नसुद्धा मिळते. केंद्र सरकार (central govt) च्या गॅरंटीवाल्या या स्कीममध्ये योग्य स्ट्रॅटेजीसह हजारो रुपयांचे लाखो बनवू शकता. तसेच आणखी एक फायदा इंटरेस्टवर मिळणार्‍या इन्कम टॅक्सच्या सूटचा आहे. PPF मध्ये मॅच्युरिटीच्या रक्कमेवर सुद्धा टॅक्स लागत नाही.

मिळेल 7.1 टक्के व्याज
PPF मध्ये आता गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के व्याजदर मिळू शकतो. हा दर 30 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी आहे. याचा मॅच्युरिटीचा कालावधी 15 वर्षांचा असतो आणि यानंतर इन्व्हेस्टर रक्कम काढू शकतात किंवा जारी ठेवण्याचा पर्याय निवडू शकतात. पाच वर्षांसाठी कालावधी वाढवू शकता.

 

1,000 रुपये होतील 18 लाख रुपये

जर PPF मध्ये दरमहिना 1,000 हजार रुपये जमा केले तर 15 वर्षात तुमच्याकडे जवळपास 3.25 लाख रुपये जमा होतील.
ही रक्कम गुंतवणुकीच्या कालावधीदरम्यान इंटरेस्ट रेटमध्ये बदल न होण्याच्या अंदाजावर ठरवली आहे.
या 3.25 लाख रुपयांच्या रक्कमेतून जवळपास 1.80 लाख रुपये तुमच्याकडून करण्यात
आलेली गुंतवणूक आणि जवळपास 1.45 लाख रुपये तुमच्या फंडवर 15 वर्षादरम्यान मिळालेले व्याज आहे.

यानंतर ही गुंतवणुकीला पाच वर्षासाठी आणखी वाढवल्यास जवळपास 8.24 लाख रुपये मिळतील.
अशाप्रकारे जर तुम्ही गुतवणुकीला पाच वर्षासाठी वाढवत राहिलात
तर तुमच्या लक्ष्याजवळ पोहचण्यास मदत होईल. जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणुकीची सुरुवात
अशाप्रकारे पुढे वाढवली तर जवळपास 35 वर्षात तुम्ही 18 लाख रुपयांची बचत करू शकता.

Web Title :-  Best Investment Plan | invest only 1k rupees in ppf schemes and get 18 lakh rupees check how details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | लागोपाठच्या घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवे दर

Corona in India | चिंताजनक ! देशात मागील 24 तासांत 38,667 नवे बाधित, 478 जणांचा मृत्यू

Partition Horrors Remembrance Day | 14 ऑगस्टला ’विभाजन भय स्मरण दिन’ साजरा केला जाईल, PM म्हणाले – ‘फाळणीच्या वेदना विसरता येऊ शकत नाहीत’