फ्री कॉलिंग, इंटरनेट 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळताहेत Jio चे ‘हे’ बेस्ट प्लॅन्स् !

0
24
Reliance Jio
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही Reliance Jio युजर्स असाल तर तुमच्यासाठी अत्यंत कमी किमतीत प्लॅन्स् आणण्यात आले आहेत. यामधून तुम्हाला जास्त डाटा आणि कॉलिंगचा आनंद घेता येऊ शकतो. Jio ने ग्राहकांसाठी काही निवडक परवडणारे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. त्यानुसार, तुम्हाला 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीत बेस्ट प्लॅन्स् मिळू शकतात.

Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळू शकते. याशिवाय दररोज 1.5GB पर्यंत हाय-स्पीड इंटरनेट डाटा मिळू शकतो. तसेच Jio नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड मिनिट्स मिळत आहेत. इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी सर्वाधिक 1000 मिनिटे दिली जात आहेत. याशिवाय 100 फ्री SMS ची सुविधाही मिळू शकते.

75 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 75 रुपयांच्या प्री-पेड रिचार्जवर 28 दिवसांची वैधता मिळू शकते. या प्लॅनमध्ये 3G डाटासह Jio नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळू शकतात. याशिवाय इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिटे दिली जात आहेत.

125 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 125 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनवर 14 GB चा डाटा मिळतो. याशिवाय Jio नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. याशिवाय इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिटे दिली जात आहे. 125 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 300 SMS फ्री मिळत आहेत.

155 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 155 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनवर 28 दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लॅननुसार, दररोज 28 दिवसांसाठी 1GB डाटा मिळणार आहे. या प्लॅननुसार, फ्री मिनिटे आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिटे मिळत आहेत. या प्लॅनमध्ये 300 फ्री SMS ची सुविधा दिली जाते.

185 रुपयांचा प्लॅन
Jio च्या 185 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनवर 28 दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लॅनमध्येही 28GB डाटा मिळतो. याशिवाय Jio नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर फ्री 500 मिनिटे दिली जात आहे. तसेच 300 फ्री SMS ही मिळत आहेत.