Best Marathi Films 2022 | जाणून घ्या यंदाच्या 2022 मध्ये गाजलेल्या मराठी चित्रपटाबाबत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन : Best Marathi Films 2022 | 2022 हे वर्ष सिनेसृष्टीसाठी फार महत्त्वाचे होते. कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षक चित्रपटगृहात येऊन चित्रपट पहायला येत होते. आज आपण जाणून घेऊया अशाच 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांबाबत. (Best Marathi Films 2022)

‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले होते. तर या चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे हे मुख्य भूमिकेत दिसले होते. त्यानंतर ऐतिहासिक सिनेमांमध्ये प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट देखील 2022 या वर्षात खूप गाजला. या चित्रपटात गश्मीर महाजनीने छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारली होती. यानंतर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाने देखील सर्वांचे लक्ष वेधले होते. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाने 2022 या वर्षात प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती. 2022 या वर्षात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेला चित्रपट म्हणजे ‘गोष्ट एका पैठणीची’. हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून नावाजला होता. (Best Marathi Films 2022)

तर याच वर्षात राष्ट्रीय पुरस्कारावर आणखीन एका मराठी चित्रपटाने नाव कोरले आहे.
ते चित्रपट म्हणजे ‘मी वसंतराव’, राहुल देशपांडे यांनी चित्रपटात वसंतराव देशपांडेची भूमिका साकारली होती.
ऐतिहासिक चित्रपटांपैकी ‘पावनखिंड’ या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
दिगपाल लांजेकरनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. शिवराज अष्टक मधील हा त्यांचा तिसरा चित्रपट होता.
त्याच पाठोपाठ 2022 या वर्षात अजून एक गाजलेला ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘शेर शिवराय’.
दिगपाल लांजेकरच्याच शिवराज अष्टक मधील हा चौथा चित्रपट होता.
तर वर्षाच्या अखेर अगदी गोड अनुभव देणारा चित्रपट म्हणजे ‘गोदावरी’ अभिनेते विक्रम गोखले यांचा हा
शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची मन जिंकली होती.

Web Title :- Best Marathi Films 2022 | best marathi films of 2022 pawankhind dharmaveer chandramukhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jaykumar Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

Ram Setu | रामसेतू खरेच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्री संसदेत म्हणाले…

GST | दुकानदारांसाठी महत्वाची बातमी! 31 डिसेंबरपूर्वी करा हे काम अन्यथा भरावा लागेल मोठा दंड