Best Multibagger Stocks | वर्षभरात ‘या’ स्टॉकने दिला 115% रिटर्न, ब्रोकरेज फर्मने म्हटले – लवकर खरेदी करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Best Multibagger Stocks | रिजिड पॅकेजिंग व्यवसाय करणार्‍या Mold-Tek Packaging या कंपनीने रिटर्नच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे. गेल्या एका वर्षात हा स्टॉक 100 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे तो वाढण्याची शक्यता अजूनही कमी झालेली नाही. एका ब्रोकरेज फर्मने हा शेअर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. (Best Multibagger Stocks)

 

कंपनी पेंट, लुब्रिकंट, FMCG आणि फुड इंडस्ट्रीला पॅकेजिंग पुरवते. गेल्या 1 वर्षात या शेयरमध्ये 115 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, यंदा या स्टॉकची कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही. 2022 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक सुमारे 8 टक्क्यांनी घसरला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या 3-4 आठवड्यांपासून या शेअरवर बाजारातील विक्रीचा दबाव आहे.

 

ब्रोकरेज फर्म Centrum Broking च्या म्हणण्यानुसार, या स्टॉकमध्ये बरीच वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी व्यवहार बंद झाल्यानंतर शेअर 1.80 टक्क्यांनी घसरून 725.70 रुपयांवर आला. ब्रोकरेज फर्मने त्यासाठी 808 रुपयांचे टार्गेट दिले आहे. म्हणजेच हा मल्टीबॅगर स्टॉक येत्या काळात डबल डिजिट रिटर्न देऊ शकतो. सेंट्रम ब्रोकिंगला पुढील 3 वर्षांसाठी या स्टॉकमध्ये संभाव्यता दिसत आहे. (Best Multibagger Stocks)

सेंट्रम ब्रोकिंगचे म्हणणे आहे की ही जगातील एकमेव पॅकेजिंग कंपनी आहे, जी पूर्णपणे बॅकवर्ड इंटिग्रेटेड आहे. कंपनीकडे इन-हाऊस टूल रूम, डिझाईन स्टुडिओ, रोबोट मॅन्युफॅक्चरिंग आणि लेबल मेकिंग यासारख्या सुविधा आहेत. ही वैशिष्ट्ये कंपनीला नावीन्यतेला गती देण्यास आणि नवीन उत्पादनांचे डिझाईन्स लवकर तयार करण्यास सक्षम बनवतात.

 

Mold-Tek Packaging इंजेक्शन मोल्डेड रिजिड पॅकेजिंगमध्ये बाजारात अव्वल आहे.
कंपनीचे सध्या 10 प्लांट असून त्यांची क्षमता 40 हजार टन आहे. एशियन पेंट्स, कॅस्ट्रॉल,
अमूल आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांसारख्या मोठ्या कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत.
कंपनी उन्नाव प्लांटची क्षमता मार्च 2023 पर्यंत 2,500 टनांपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे.
आगामी काळात, ते FMCG, कॉस्मेटिक आणि फार्मा क्षेत्रांसाठी ब्लो मोल्डिंग कंटेनर तयार करणार आहेत.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :-  Best Multibagger Stocks | best multibagger stocks nse bse centrum broking mold tek packaging business

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Post Office Scheme | 400 रुपये जमा करून 1 कोटीचे मालक बनायचे असेल तर ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

 

Mouni Roy Bold Photo | मौनी रॉयनं ब्रालेटमध्ये दिल्या मिलियन डॉलरच्या पोज, फोटो झाले व्हायरल

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या रूग्णसंख्येच्या तुलनेत बर्‍या होणार्‍यांची संख्या तिप्पटीपेक्षा जास्त