Jio ग्राहकांसाठी खुषखबर ! एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर मिळवा अनलिमिटेड सुविधा

नवी दिल्लीः वृत्त संस्था – देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने एक खास प्लॅन लॉन्च केला आहे. कंपनीने प्रीपेड यूजर्सासाठी हा खास प्लॅन लॉन्च केला असून यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा दिली जात आहे. म्हणजेच यूजर हा प्लॅन घेऊन एकदा रिचार्ज करत वर्षभर फ्री कॉल आणि डेटाचा वापर करू शकतात.

रिलायन्स जिओ कंपनीने आता 336 दिवसांची मुदत असलेला प्लॅन ऑफर केला आहे. यामुळे ग्राहकांना भरपूर फायदा मिळणार आहे. जिओच्या 1299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची मुदत 336 दिवस आहे. तुम्हालाही या ऑफरचा फायदा घ्यायचा असल्यास जिओच्या वेबसाईटवर Other कॅटेगिरीमध्ये जाऊन घेता येऊ शकते. यात ग्राहकांना जवळपास 24 GB डेटाही ऑफर केला जात आहे.

कंपनीने दिलेला 24GB डेटा संपल्यानंतर याचे स्पीड कमी होऊन 64Kbps वर येते. एवढच नाही तर याच वापरकर्त्यांना जिओ ॲप्सचे सबस्क्रीप्शनही मोफत मिळत आहे. कॉलिंगसाठी यात जीओ टू जीओ आणि इतर कॉलसाठीही फ्रीमध्ये फायदा दिला जात आहे. तसेच यात 3600 SMS ही फ्री मिळत आहेत.