डिजिटल मार्केटिंग कोर्स आणि डाटा अनालिसिससह ‘या’ क्षेत्रात चांगल्या करियर ग्रोथची संधी, जाणून घ्या डिटेल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महामारीनंतर जगात अनेक प्रॉडक्ट आणि शाश्वत मार्केट स्ट्रॅटजी डिजिटल मोडमध्ये शिफ्ट झाली आहे. ही काळाची मागणी सुद्धा आहे. यासाठी डिजिटल मार्केटिंगचे (digital marketing course) महत्व वाढले आहे. या अंतर्गत डिजिटल बिझनेस अनालिसिस, कंटेंट मार्केटिंग, एसईओसह अनेक गोष्टी शिकवल्या जातात. याशिवाय, आता आर्गनायजेशन अशा लोकांना नोकरीवर ठेवत आहेत, जे डिजिटल मार्केटिंग स्किलने त्यांचे ऑनलाइन प्रमोशनल आणि सेल्स कॅम्पेनमध्ये मदत करतील. अनेक आर्गनायजेशन आपल्या कर्मचार्यांना डिजिटल मार्केटिंग स्किल वाढवण्यासाठी ट्रेनिंग देत आहेत, तर अन्य आर्गनायजेशन अशा नवीन लोकांना कामावर ठेवत आहेत. याच कारणामुळे अलिकडच्या काही महिन्यात डिजिटल मार्केटिंगशी संबंधित कोर्सची मागणी खुपच वाढली आहे. आपल्या बायोडाटामध्ये डिजिटल मार्केटिंग कोर्सचा समावेश केल्यास तुमच्याकडे वर्तमान जॉब मार्केटमध्ये मोठी उडी मारण्याची चांगली संधी आहे.
शिका डाटा अनालिसिस :
डिजिटल अर्थव्यवस्थेत डाटा अनालिसिस आर्गनायजेशनला मार्केट चांगल्या प्रकारे समजणे, पूर्वअंदाज आणि त्यानुसार योजना आखण्यास एक उपयोगी स्ट्रॅटेजी बनवावी लागते. डाटा अनालिस्ट द्वारे तयार करण्यात आलेला रिपोर्ट आणि अंदाजित डाटा अनालिसिस बिझनेस ऑपरेशन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि स्ट्रॅटेजीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात. डाटा अनालिस्टची मागणी अलिकडच्या दिवसात खुप वाढली आहे.
क्रिएटिव्ह स्किल :
क्रिएटिव्हिटी कधीही ‘आऊट ऑफ फॅशन’ होत नाही. ती नेहमी तुमच्यात क्रिएटिव्ह विचारांना प्रोत्साहन देते. गर्दीच्या मार्केट स्पेसमध्ये क्रिएटिव्ह पद्धतीने एखादी वस्तू सादर करणे किंवा आपल्या आयडिया आणि विचारांना व्यक्त करण्याची क्षमता तुम्हाला महत्वपूर्ण दृष्टीने वेगळी बनवते. यासाठी हे आवश्यक आहे की, आपली क्रिएटिव्ह बाजू सातत्याने वाढवत राहा, क्रिएटिव्ह कम्युनिकेशन स्किल, क्रिएटिव्ह पॉवर, मार्केटिंग स्किल आणि क्रिएटिव्ह रायटिंग स्किल वाढवा जेणेकरून तुम्ही या स्पर्धेच्या मार्केटमध्ये आपले स्थान बनवू शकता. आपला वेळ वाचणात, क्रिएटिव्ह रायटिंग स्किल किंवा फोटोग्राफी शिकण्यात घालवा जेणेकरून बायोडाटा प्रभावी बनू शकतो.
शिका नवी भाषा :
असे आढळले आहे की, जेव्हा तुम्हाला अतिरिक्त भाषा येते तेव्हा ती तुमच्या स्कीलला नवी धार देते. ती तुम्हाला इतरापेक्षा वेगळे बनवते. नवी भाषा शिकल्याने स्किल आणि क्षमता वाढतेच, शिवाय ती तुमच्या बुद्धीलाही तीष्ण करते आणि नव्या आयडियांवर विचार करण्यासाठी तुम्हाला फोकस प्रदान करते. परंतु, कोणती भाषा तुम्ही शिकावी, हे सुद्धा खुप महत्वाचे आहे. जसे की, अलिकडे जपानसह अनेक देश भारतीय तरूणांना जॉब देण्यात प्राथमिकता देत आहेत. अशावेळी जर त्या देशांची भाषा शिकलात तर तिथे चांगली संधी मिळू शकते. कोणतीही भाषा शिकण्याचा निर्णय यावर अवलंबून असतो की तुमच्या कामाचा मुख्य एरिया काय आहे. अशी भाषा शिका जी तुमच्या कार्यक्षेत्रात उपयोगी असेल. उदाहरणार्थ जर तुमचे कार्यक्षेत्र तुम्हाला एखाद्या युरोपीय देशात घेऊन जात असेल, तर तुम्हाला एखादी युरोपीय भाषा शिकण्याबाबत विचार केला पाहिजे. जर तुम्ही उत्तर भारतीय आहात आणि करियर दक्षिण भारतात करायचे आहे तर तुम्हाला संबंधित दक्षिण भारतीय राज्यातील भाषा शिकण्याबाबत विचार केला पाहिजे.
ग्राफिक डिझायनिंग :
ग्राफिक डिझायनिंग असे स्किल आहे ज्याची मागणी सध्या खुप आहे. ग्राफिक डिझायनिंग यासाठी केले जाते की, तुम्ही तुमच्या कन्सेप्टला एक व्हिज्युअल रूप देऊ शकता. जी चांगल्याप्रकारे लोकांना समजेल आणि त्यांना आकर्षित करेल. इंफोग्राफिक आणि व्हिज्युअल अपील्सच्या काळात कंटेट आता केवळ शब्दांपुरताच मर्यादित राहातो. आता कंटेट व्हिज्युअल एलिमेंट, इन्फॉर्मेटिव्ह चित्र, चार्ट, स्टॅटिस्टिक्समध्ये सादर होऊ लागेल आहे. या एलिमेंट्सला सजवून रचनातमक पद्धतीने सादर करणे ग्राफिक डिझायनरचे काम असते. जर तुमच्याकडे क्रिएटिव्ह माईंड आहे, तर तुम्ही ग्राफिक डिझाईन कोर्स करू शकता. यातून तुम्हाला तुमच्यासाठी एक नवीन करियर ऑपशन तयार करण्यात मदत मिळू शकते.
बिझनेस स्किल ट्रेनिंग :
वेगाने बदलणार्या जगात एकच स्किल आता कामी येणार नाही. डायनामिज्म, क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लम सोडवण्याची क्षमता आजच्या प्रोफेशनल्ससाठी महत्वपूर्ण एलिमेंट आहे. जर तुम्ही एंटरप्रेन्युअर आहात आणि आपल्या बिझनेला वाढवायचे असेल तर एक प्रोफेशनल बिझने ट्रेनिंग कोर्स केल्याने तुम्हाला तुमचा व्यापर वाढवण्यात मदत मिळू शकते. यातून तुमच्या बायोडाटात एका नव्या आयामचा समावेश होईल. बिझनेस स्किल ट्रेनिंग कोर्सने प्रोफेशनलना आवश्यक फायनान्शियल मॅनेजमेंट, लीडरशिप, समस्या सोडवण्याचे स्किल आणि टाइम मॅनेजमेंटला समजण्यास मदत होईल. हे एंटरप्रेन्युअर आणि मॅनेजर दोघांसाठी आवश्यक स्किल शिकण्यात मदत करते.
योग्य स्किल शिकण्यात उपयोगी :
कोविड-19 मुळे ऑफलाइन क्लासमध्ये येत असलेल्या अडचणी पाहता स्टुडेंट्स ऑनलाइन लर्निगकडे वळत आहेत. यासाठी अनेक एज्युकेशन-टेक स्टार्टअप सुद्धा आले आहेत, ज्यांचा जोर घोकंमपट्टी करून शिकवण्यावर नसून कमी वयापासूनच योग्य स्किल शिकण्यावर आहे. अशाच काही प्लॅटफॉर्म्स बाबत जाणून घेवूयात…
हे आहेत ते प्लॅटफॉर्म्स
* कॉन्सेप्ट लर्निंग
* हेल्थ केयर प्रॅक्टिशनर ट्रेनिंग
* स्किल डेव्हलपमेंट
* जॉब लीडिंग कोर्स
* ऑनलाईन लर्निंग
हे लक्षात ठेवा
* नव्या वर्षात साधा नवे संतुलन
* गुणवत्तेकडे लक्ष द्या
* आरोग्याकडे लक्ष द्या
* आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्या
* कौशल्य विकासकडे लक्ष द्या
* स्वत:ला वेळ द्या