Best Pension Plan Retirement Scheme | दरमहा मिळेल 9 लाख रुपयांची पेन्शन ! तात्काळ सुरू करा गुंतवणूक, जाणून घ्या ‘प्लान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Best Pension Plan Retirement Scheme | प्रत्येकाचे स्वप्न असते की, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, जीवनात सर्व सुख-सुविधा असाव्यात, मुलांच्या संगोपनात कोणत्याही अडचणी येऊ नयेत. आणि यासाठी आपण दिवसारात्र मेहनत करत असतो. परंतु सर्वच स्वप्न पूर्ण होत नाहीत. याच गडबडीत आपण विशेषता प्रायव्हेट सेक्टरमधील नोकरदार लोक आपल्या निवृत्तीसाठी कोणताही प्लान बनवू शकत नाहीत. (Best Pension Plan Retirement Scheme)

 

आतापासून करा भविष्याचे प्लानिंग

 

ज्या वेगाने महागाई वाढत आहे, निश्चितच आगामी काळात स्वप्न पूर्ण करणे तर दूर, रोजचे खर्च चालवणे अवघड होत आहे. यासाठी आपल्याला आतापासून प्लानिंग करून वाटचाल करावी लागेल. आपल्या खर्चांवर लगाम लावून भविष्याच्या गरजांसाठी बचत करावी लागेल.

 

महानगरांमध्ये एका कुटुंबाचा खर्च जवळपास एक लाख रुपयांच्या जवळपास येतो. कल्पना करा की आगामी 25-30 नंतर हा खर्च किती होईल. आज आपण धावपळ करू शकतो, परंतु जेव्हा आपण जीवनाच्या अंतिम आवस्थेत प्रवेश करू तेव्हा काय होईल, तेव्हा इतकी धावपळ करता येईल का. निश्चितच नाही. (Best Pension Plan Retirement Scheme)

 

निवृत्तीचे प्लानिंग आत्ताच

 

यासाठी आपल्याला उद्याचे प्लॅनिंग आजपासून करून पुढे वाटचाल करावी लागेल. विशेषता ते तरूण जे आपले व्यावसायिक जीवन सुरू करत आहेत, त्यांना निवृत्तीचे प्लानिंग सुद्धा करावे लागेल.

 

SIP गुंतवणूक देईल दिलासा

 

इन्व्हेस्टमेंट प्लानर म्हणतात की, भविष्यातील कोणतीही आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी (Mutual Fund SIP investment) च्या माध्यमातून गुंतवणूक केली पाहिजे. सातत्याने कमी होणारे व्याजदर, बाजाराची अस्थिरता आणि वाढत्या महागाईने आपल्याला एसआयपी गुंतवणूकच दिलासा देऊ शकते.

 

म्युच्युअल फंड कॅलक्युलेटर (Mutual fund SIP calculator)

 

करोडपती बनण्यासाठी तुम्हाला 30 वर्षासाठी दरमहिना 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
महागाई दराला मात देण्यासाठी या गुंतवणुकीला 10 टक्केच्या हिशेबाने वाढवावे सुद्धा लागेल.
एसआयपी कॅल्क्युलेटर सांगतो की, 30 वर्षानंतर तुमच्याकडे 12,69,88,106 म्हणजे 12.70 कोटी रुपये जमू शकतात.

 

सिस्टमॅटिक विदड्रॉल प्लान (Systematic Withdrawal Plan)

 

जाणकार सांगतात की, सिस्टमॅटिक विदड्रॉल प्लानमध्ये एसआयपीमधून जमवलेली जवळपास 12.70 कोटी रुपयांची रक्कम गुंतवल्यास तुम्ही नियमित मासिक उत्पन्न घेऊ शकता.
12.70 कोटीवर वार्षिक 8 टक्केच्या रिटर्नने दरमहिना जवळपास 9 लाख रुपये रिटर्नची अपेक्षा करू शकता.

 

Web Title : Best Pension Plan Retirement Scheme | best pension plan retirement scheme crorepati kaise bane money making tips

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Solapur Crime | माढा तालुक्यात टेंभुर्णी पुलाशेजारी ट्रक-टॅंकरचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जखमी

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, तीन ट्रक एकमेकांना धडकले

8 राज्यांमध्ये आकाशातून होणार संकटाचा वर्षाव! IMD ने 1 डिसेंबरपर्यंत दिला जोरदार पावसाचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रा संदर्भातील पावसाचा अंदाज