फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफीसच्या या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास होईल फायदा, इथं मिळतात सर्वाधिक रिटर्न

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना काळात कोणत्याही व्यक्तीसाठी मोठी बचत करणे जवळपास अशक्य दिसत आहे. मात्र, याचा अर्थ हा नाही की, या काळात बचत करू नये. जर तुम्हाला छोट्या-छोट्या बचतीमधून भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग स्कीम्समध्ये जरूर गुंतवणूक करा. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये अनेक फायदे आहेत. या स्कीममध्ये सरकारी गॅरंटी असल्याने जोखीम कमी असते. सोबतच, रिटर्न सुद्धा चांगले मिळते.

आता पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणारे लोक सुद्धा नेट बँकिंग सुविधा वापरू शकतात. सेविंग्स अकाऊंटसाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा असल्याने कोट्यवधी ग्राहक घरबसल्या आवश्यक कामे करू शकतात. यात खातेधारक घरबसल्या कुणालाही पैसे पाठवू शकतात, अकाऊंट स्टेटमेंट पाहू शकतात. याशिवाय खातेधारक इंटरनेट बँकिंगच्या मदतीने आरडी, पीएफ, एनएससी स्कीममूधन संबंधित सर्व कामे करू शकतात.

काय आहेत नेट बँकिंगच्या अटी?
इंडिया पोस्ट बचत खाते असणार्‍या ग्राहकांना नेट बँकिंग सुविधा वापरण्यासाठी काही अटी आहेत. वॅलिड सिंगल किंवा जॉईंट अकाऊंट पाहिजे, केवायसी संबंधी कागदपत्र, अ‍ॅक्टिव्ह एटीएम कार्ड, अकाऊंटशी मोबाईल नंबर लिंक असावे, अकाऊंटशी ईमेल आयडी रजिस्टर्ड असावा, अकाऊंटशी पॅन नंबर रिजस्टर्ड असावा.

प्रत्येक तीन महिन्याला रिवाईज होतात व्याजदर
या स्कीम्सवर असलेले व्याजदर अर्थ मंत्रालय प्रत्येक तीन महिन्याला रिवाईज करते. यानंतर नोटिफिकेशन जारी करून याबाबत माहिती दिली जाते. ही लागोपाठ तिसरी तिमाही आहे, ज्यामध्ये स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम्सच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

1 यानुसार, पाच वर्षांसाठी सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीमवर 7.4 टक्केच्या दराने व्याज मिळेल. या स्कीमवर व्याजदर तिमाही अशाधारावर दिला जातो. सेव्हिंग्ज डिपॉझिटवर व्याजदर 4 टक्के वार्षिक हिशेबाने असेल.

2 सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) वर 7.6 टक्के दराने व्याज मिळत राहील. 7.6 टक्के दराने हे व्याज चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी असेल.

3 किसान विकास पत्र (केव्हीपी) वर 6.9 टक्केच्या व्याजदराने व्याज मिळेल.

4 एक ते पाच वर्षासाठी टर्म डिपॉझिट वर 5.5-6.7 टक्केच्या दराने व्याज मिळेल. ते तिमहाी आधारावर दिले जाईल.

5 याशिवाय 5 वर्षाच्या रिकरिंग डिपॉझिटवर 5.8 टक्केच्या दराने व्याज मिळेल.

6 नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटवर 6.8 टक्केच्या दराने व्याज मिळेल.

7 तर, पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (पीपीई) वर तिसर्‍या तिमाहीत 7.1 टक्केच्या दराने व्याज मिळेल.